Aloo Chop sakal
फूड

Aloo Chop Recipe: नाश्ता स्पेशल बनवायचा असेल तर 'आलू चॉप' ट्राय करून पाहा, जाणून घ्या रेसिपी

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सकाळचा हेल्दी नाश्ता केला पाहिजे.

Aishwarya Musale

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सकाळचा हेल्दी नाश्ता केला पाहिजे. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा भरून राहते. अशा परिस्थितीत प्रत्येकजण आपला नाश्ता खास बनवण्याचा प्रयत्न करतो. नाश्ता चविष्ट आणि आरोग्यदायी असावी यासाठीही प्रयत्न केले जातात. यासाठी लोक विविध प्रकारचे रेसिपीज करून पाहत असतात. पण तुम्ही कधी आलू चॉप ट्राय केला आहे का?

आम्ही तुम्हाला सांगतो की आलू चॉप बंगालच्या प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. नाश्त्यापासून ते स्नॅक्सपर्यंत हा एक उत्तम पर्याय आहे. घरात बनवल्याबरोबर लहान मुले आणि मोठ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि ते फार कमी वेळात तयार होते. आलू चॉप बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया-

उकडलेले बटाटे - 4 मोठे बटाटे मोठ्या साईजचे

  • बेसन - 200 ग्रॅम

  • कॉर्न फ्लोअर - 3 चमचे

  • आले-लसूण पेस्ट - 4 टीस्पून

  • बारीक चिरलेला कांदा - २

  • बेकिंग सोडा - 1 टीस्पून

  • चिरलेली हिरवी मिरची - ३

  • लाल तिखट - 1 टीस्पून

  • चिरलेली कोथिंबीर - 2 टेस्पून

  • हळद - 1 टीस्पून

  • गरम मसाला - १/२ टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - अंदाजानुसार

कसे बनवावे

टेस्टी आलू चॉप बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे घेऊन प्रेशर कुकरमध्ये बॉईल करून घ्या. यानंतर, हे बटाटे सोलल्यानंतर, एका भांड्यात ठेवा आणि ते सर्व मॅश करा. यानंतर एक कढई घ्या, त्यात तेल टाका आणि गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका.

कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाका. आता हे मिश्रण १ ते २ मिनिटे भाजून घ्या. यानंतर त्यात चिरलेली हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीरही टाका.

आता या तयार मिश्रणात आधीच मॅश केलेले बटाटे टाका. ते मिश्रणात चांगले मिसळा. थोडा वेळ भाजल्यानंतर चॉपचे मिश्रण तयार होते. आता गॅस बंद करा. ते थंड झाल्यावर दुसरी वाटी घेऊन त्यात बेसन, कॉर्नफ्लोअर आणि थोडी बेकिंग पावडर घालून सर्व मिक्स करा. आता त्यात थोडे पाणी मिसळून बेसनाचे पीठ तयार करा. लक्षात ठेवा की थोडे थोडे पाणी घाला.

यानंतर तयार केलेले बटाट्याचे मिश्रण घेऊन त्यापासून लहान टिक्की बनवा. जेव्हा सर्व टिक्की तयार होतील तेव्हा त्या बेसनाच्या पिठात एक एक करून बुडवा. यानंतर टिक्की तळण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर टिक्की तळून घ्या.

या वेळी गॅसची फेल्म मध्यम असावी हे लक्षात ठेवा. टिक्की दोन्ही बाजूंनी ब्राउन आणि कुरकुरीत झाल्यावर प्लेटमध्ये एक एक करून काढा. आता तयार टेस्टी आलू चॉप हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT