Tri Color Juice Recipe: संपुर्ण देशातील लोकांसाठी स्वातंत्र्य दिन खुप खास आहे. या दिनानिमित्त सर्व शासकीय आणि खाजगी संस्था, शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त लोक थीमनुसार बऱ्याच गोष्टी करतात. जसे की कपडे, खाद्यपदार्थ आणि सजावट देखील तिरंगी थीममध्ये केली जाते. तुम्ही या खास प्रसंगी तिरंग्याच्या थीममध्ये घरीच आरोग्यदायी ज्युस बनवू शकता. यासाठी किवी आणि संत्र्याचा वापर करू शकता. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी, पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चला तर मग जाणून घेऊया ज्युस कसा बनवावा.
किवीचा गर- १ छोटा कप
व्हॅनिला आइस्क्रीम- ४ चमचे
संत्र्याचा गर- १ छोटा चमचा
बर्फाचे तुकडे- ४-५
लिंबू मसाला- २ चमचे
तिरंगा ज्युस बनवण्यासाठी सर्वात आधी किवी स्वच्छ धुवून घ्या. नंतर बारिक चिरून मिक्सरमध्ये बारिक करा. नंतर संत्र्याचा गर काढून एका वाटीत काढावा. नंतर एक ग्लास घेऊन त्यात किवीचा गर टाकावा. यानंतर लिंबू मसाला घालून चमच्याने चांगले मिक्स करा. नंतर ग्लासमध्ये व्हॅनिला आइस्क्रीम टाकावे. नंतर संत्र्याचा गर टाकावा. नंतर बर्फाचे तुकडे टाकून थंडगार तिरंगा ज्युस सर्व्ह करू शकता. घरातील सदस्यांना किंवा पाहूण्यांना हा ज्युस नक्की आवडेल. तसेच तुम्ही आवडीनुसार देखील सजावट करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.