Independence Day Sakal
फूड

Independence Day: स्वातंत्र्य दिनानिमित्त घरच्या घरीच बनवा 'ही' तिरंगा थाळी; 'या' पदार्थांनी सजवा ताट

Independence Day: स्वातंत्र्य दिनानिमित्त घरीच घेऊ शकता तिरंगा थाळीचा आस्वाद

पुजा बोनकिले

Independence Day: दरवर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. देशातील प्रत्येक नागरिकासाठी हा दिवस खास आहे. १५ ऑगस्ट १९४७ साली ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले. यंदा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येकजण तिरंगी थीममध्ये सजावट करतात तर काही लोक तीरंगी पदार्थ बनवतात. स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी असे आणि तुम्ही कुठे बाहेर जाणार नसाल तर घरीच तिरंगा थाली बनवू शकता. तिरंगी थाली बनवणे खुप सोपे आहे. यामध्ये पुढील पदार्थांचा समावेश करू शकता.

तिरंगा पुरी

तिरंगा पुरी बनवून तिरंगा थाली सजवू शकात. तुरंगा पुरीसाठी तीन रंगाचे पीठ मळून घ्यावे आणि त्यापासून पुरी तयार करावी. यासाठी फुड कलरचा वापर करावा.

कढाई पनीर

तिरंगा थालीमध्ये कढाई पनीर बनवू शकता. यामध्ये तुम्ही खाण्याचा केशरी रंग टाकू शकता. सिमला मिरची आणि पनीर मिक्स करावे.

तिरंगा पुलाव

या खास दिवशी तिरंगा पुलाव बवनू शकता. यामुळे तिरंगा थालीची मज्जा द्विगुणित होईल. हिरवा आणि केशरी रंग येण्यासाठी खाण्याचा रंग वापरू शकता.

फ्रुट सॅलेड

भाज्यांएवजी फ्रुट सॅलेड बनवू शकता. यासाठी काकडी, केळी आणि पपईचा वापर करू शकता. तिरंगा थालीत मस्त तिरंगा फ्रुट सलाद सजवून ठेऊ शकता.

पालक पनीर

पालक पनीरचा रंग हिरवा असतो. यामध्ये कोणताही रंग टाकण्याची गरज नाही. पुरीसोबत या भाजीचा आस्वाद घेऊ शकता.

रायता

तिरंगा रायता बनवण्यासाठी काकडी, गाजर आणि बारिक चिरलेली कोथिंबीर वापरू शकता. हा रायता बनवणे अगदी सोपे आहे. तसेच रायताशिवाय तिरंगा थाली पुर्ण होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT