फूड

बेली फॅट ,Lower Fat बर्न करण्यासाठी वापरा मसाल्यातील 'हे' पदार्थ

सकाळ डिजिटल टीम

आपण रोज व्यायाम करतो योग्य वेळी जेवण ही घेतो मात्र बेली फॅट, आणि लोअर फॅट लवरक कमी होत नाही. नेहमी नविन कपडे खरेदी करताना किंवा अगदीच कोणताही कार्यक्रम असेल तर अडचण येते. अश्यावेळी नेमके काय करावे हा प्रश्न पडतो? खरंतर कोणतेही हार्ड डाइट न करता. आपल्या स्वयंपाक घरातील भारतीय मसाल्यातील असे काही पदार्थ आहेत ज्याचा फायदा तुम्हाला बेली फॅट, लोअर फॅट कमी करण्यास नक्कीच होईल.

आपण स्वयंपाकात रोजच मसाल्याचा वापर करतो. पश्चिम महाराष्ट्रात आमटी बनवण्यासाठी चटणी वापरली जाते. ज्यात सगळ्या मसाल्यांचा आधिच वापर केलेला असतो. मात्र बऱ्याचदा डाइट करत असताना हे रोज खाल्ले जाईल हे सांगता येत नाही. म्हणूनच रोज जाणिवपूर्वक आता मसाल्याचा वापर करा. चला जाणून घेऊया कोणते मसाले नियमीत वापरावे.

काळी मिरी: काळी मिरीचा वापर आपण विशेषता मसाले भात किंवा मांसाहारी पदार्थ बनवताना करतो.मात्र काळी मिरी ही चवीसोबत चरबी कमी करण्यास मदत करते. काळी मिरी मेटाबॉलिझम वाढावायला मदत करते. यात फायटर न्यूट्रीशन नावाचा घटक असतो जो चरबी कमी करण्यास मदत करतो. रोज चिमूटभर मिरी खाल्याने तुमच्या पोटावरील आणि लोअर बाॅडीवरील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.

डालचिनी : डालचिनी अॅटीआॅक्साइड आणि अॅन्टी इंफ्लीमेंन्टरी म्हणून काम करते. शिवाय शुगर कमी करण्यास ही मदत करते. तुम्ही दालचिनीचा चहा किंवा वेटलाॅस ड्रिंक म्हणून घेऊ शकता.

वेलची

वेलचीमध्ये मेलॅथिऑन नावाचा घटक असतो. जो चरबी कमी करण्यास मदत करतो. आपण वेलची मसाले दुध, गोड शिरा किंवा खीर बनवताना वापरतो. रोज किमान दोन वेलची किंवा चिमूटभर वेलची पावडरचा वापर केला तर चरबी कमी होण्यास मदत होते.

बडीशेप: चरबी कमी करण्यासाठी बडीशेप महत्वाचे काम करते. बडीशेपमध्ये अॅटीआॅक्साइड तसेच व्हिटॅमिन A,D, C असते. बडीशेप गरम पाण्यात घेतल्यास भूक कमी लागते. जेवणापूर्वी बडीशेप घेतल्याने नक्कीच फायदा होतो.

टीप: हे पदार्थ जास्त घेतल्यास अॅसिडीटी होवू शकते. त्यामुळे प्रमाणात घ्या.

डिसक्लेमर : या लेखातील माहिती सर्वसाधारण सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. अधिक माहितीसाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT