Breakfast Recipe : सकाळचा नाश्ता तुम्हाला एनर्जी देतो. तेव्हा सकाळचा नाश्ता कायम हेल्दी असायला हवा. तुम्ही नेहमीचा नाश्ता खाऊन कंटाळला असाल आणि तुम्हाला नाश्त्याची नवी रेसिपी ट्राय करायची असेल तर तुम्ही नाश्त्यासाठी नवी रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी तुमच्या शरीरात लोहाचे प्रमाण वाढवण्याबरोबरच ब्लड शुगर लेव्हलसुद्धा नियंत्रणात ठेवेल.
आज आपण बीटरूटचा पराठा कसा बनवायचा ते जाणूण घेऊया
गव्हाचे पीठ
बीटरूट
आलं लसणाची पेस्ट
३-४ हिरव्या मिर्च्या
मीठा चवीनुसार
जीरे
बारीक चिरलेली कोथिंबीर
२ चमचे तूप
ओवा
बीटरूटचा पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी बीटरूट बारीक किसून घ्या. त्यानंतर गव्हाच्या पीठात घालून त्यात ओवा, मीठ, तिखट घालून कणीक मळून घ्या. आता त्याचे चपातीप्रमाणे पराठे लाटा आणि तव्यावर तूप किंवा तेल घालून पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. आता हा पराठा तुम्ही दही किंवा हिरव्या चटणीसह खाऊ शकता. (Breakfast)
बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-६, मॅग्नेशियम, लोह, फायबर, पोटॅशियम आणि अन्य खनिजे असतात. ज्यामुळे तुमचा हृदयरोग आणि स्ट्रोकपासून तुमचा बचाव होतो.
बीटरूटचा पराठा बनवण्यासाठी वापरले जाणारे गव्हाच्या पिठात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, कॉपर, कॅल्शियम, आयोडिन, मँगनिज आणि पोटॅशियम असतात. ज्यामुळे तुमची पचनशक्ती चांगली राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.