Jambhul Karanji recipe of nilima nitin food  sakal
फूड

जांभूळ करंजी

आता गुगल आपल्याला फळांच्या गुणधर्माबद्दल महत्त्वाबद्दल लगेच माहिती सांगतो आणि मी गुगल केलं, तेव्हा लक्षात आलं, आजी किती बरोबर होती

सकाळ वृत्तसेवा

आता गुगल आपल्याला फळांच्या गुणधर्माबद्दल महत्त्वाबद्दल लगेच माहिती सांगतो आणि मी गुगल केलं, तेव्हा लक्षात आलं, आजी किती बरोबर होती

- नीलिमा नितीन

Jambhul Karanji recipe : माझी आजी- ते म्हणतात ना ‘अर्धी डॉक्टर’- तशी अर्धी वैद्यच होती. छोट्या-मोठ्या तक्रारींबाबत तिच्याकडे नक्कीच उपाय असायचे. पावसाळ्यातील पोटदुखीसाठी दोन प्रकारच्या लिंबोण्या चाटण म्हणून द्यायची आणि पोटदुखी लागलीच बरी व्हायची. बिबे वगैरे वापरून काही औषध असायची तिच्याकडे.

आम्ही घरचेच नव्हे, तर शेजारीपाजारी पण यायचे. आजीकडे छोट्या मोठ्या तक्रारी घेऊन. बाजारात जांभळे यायला लागली, की आजी ती भरपूर प्रमाणात मागवायची. आजीच्या मते जांभूळ हा उन्हाळ्याच्या उष्णतेचा उतारा आहे, शिवाय जांभळाच्या बियापासूनही औषध बनायचं.

आता गुगल आपल्याला फळांच्या गुणधर्माबद्दल महत्त्वाबद्दल लगेच माहिती सांगतो आणि मी गुगल केलं, तेव्हा लक्षात आलं, आजी किती बरोबर होती. जांभूळ खरंच किती गुणकारी आहे, आणि अगदी नैसर्गिक. त्यामुळे सध्या जांभळाचा सीझन असताना त्याचा आहारात समावेश व्हायला हवा. मला जांभळाचा रंगही भारी आवडतो.

हा रंग जास्तीत जास्त कसा वापरता येईल यासाठी माझी धडपड चालू असते. मी एकदा जांभळाचा आईस्क्रीम बनवण्यासाठी त्याचा मिक्सरमधून पल्प करत होते. तेव्हा तो रंग वाह! तो रंग बघून माझ्या डोक्यात विचार आला, याचं अजून काही बनवू या का? एवढा सुंदर रंग आणि फक्त एक आईस्क्रीम बहुत नाइन्साफी हे! अशा वेळी घरात काय काय वस्तू आहेत यावर बरंच काही अवलंबून असतं.

मी फ्रीज उघडला. त्यात थोडासा खवा आणि ओल्या नारळाचा किस दिसला. ठरलं, मग करंजी बनवली तर? तुम्हाला सांगते, माझ्या ‘कुक विथ नीलिमा’ फेसबुक पेजवर जेव्हा मी ही रेसिपी टाकली, तेव्हा अक्षरशः मेसेजेस, कमेंट्सचा पाऊस होता. सगळ्यात जास्त शेअर होणाऱ्या रेसिपीपैकी ही एक रेसिपी होती.

बऱ्याच जणांनी ही रेसिपी बनवून मला फोटोही पाठवले. अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला या रेसिपीला. तुम्हाला ट्राय करायची आहे का ही रेसिपी अगदी सुंदर करंजी? मग घ्या लिहून साहित्य आणि कृती.

साहित्य : करंजीसाठी

रवा अर्धा कप, मैदा एक कप, दोन ते तीन चमचे तुपाचं मोहन, एक चिमूट मीठ आणि तळण्यासाठी तेल.

साहित्य : सारणासाठी

खोवलेला नारळ एक कप, साखर पाऊण कप किंवा तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर एक कप, अर्धी वाटी खवा, वेलची पूड एक टीस्पून, चांगल्या पिकलेल्या जांभळ्यांचा पल्प एक वाटी. हा तुम्ही जेवढा जास्त वापराल तेवढा सुरेख रंग व चव येईल.

कृती :

  • करंजीसाठी लागणारं सर्व साहित्य मिळून मिसळून घट्ट पीठ भिजवून घ्यावं.

  • छान मळून, जमल्यास कुटून, झाकून पंधरा मिनिट ठेवून द्यावं. करंजी करण्यापूर्वी हे पीठ परत व्यवस्थित मिळून घ्यायला विसरू नका.

  • सारणासाठी नारळाचे तुकडे व जांभळाचे जांभूळ मिक्सरमधून वाटून घ्या (जांभळाच्या बिया काढायला विसरू नका.)

  • एका जाड बुडाच्या कढईत हे मिश्रण साखर, खवा एकत्र करून गोळा होईपर्यंत छान परतून घ्या.

  • नंतर यात वेलची पावडर घालून मिक्स करून थंड होऊ द्या. करंजीच्या पिठाच्या छोट्या आकाराच्या पुऱ्या बनवून त्यात हे सारण व्यवस्थित भरा.

  • तुम्ही विविध साच्यांचा वापर जसा मी इथे फोटोमध्ये केला आहे तसा करून विविध आकार देऊ शकता आणि नंतर कुरकुरीत तळून घ्या.

  • तयार आहे ही ही अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी अनोखी जांभूळ करंजी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT