Keep the change Domino’s offers $3 tips if you pick up your pizza yourself 
फूड

डिलिव्हरी बॉयची कमी; तुमचा Pizza तुम्हीच न्या अन् पैसे कमवा!

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रीय कामगार तुटवड्यामुळे ( national labor shortage ) अमेरिकन पिझ्झा चेन (Chain) आऊटलेटने ग्राहकांना पिझ्झा डिलिव्हर न झाल्यास पैसे परत देण्यास सुरूवात केली आहे. तर त्या उलट आपली पिझ्झा ऑर्डर पिक-अपसाठी डॉमिनॉज ग्राहकांनाच (Domino’s) पैसे देणार आहे.

डॉमिनॉजने एका निवेदन जाहीर केले असून त्यात सांगितले आहे की, जर ग्राहकांनी स्टोअरमधून त्यांची ऑर्डर स्वत:च पिक केली तर त्यांनी 3 डॉलरची टिप मिळणार आहे, जी पुढच्या ऑर्डरच्यावेळी त्यांना वापरता येईल.

''डॉमीनॉजच्या स्टोअरमधून पिझ्झा तुमच्या दारापर्यंत पोहचवणे हे कौशल्याचे काम आहे'' त्यामुळे ऑनलाईन ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना बक्षिस म्हणून 3 डॉलर टीप म्हणून देत आहोत ग्राहक त्यांच्या दिवसभराच्या कामातून वेळ काढून आणि स्वत:च डिलिव्हरी ड्राईव्हर म्हणून काम करण्याचे कष्ट घेतात म्हणून ते यासाठी नक्कीच पात्र ठरतात.'' असे डॉमिनॉजच्या एक्झक्यूटिव्ह प्रेसिडंट आणि चिफ मार्केटिंग ऑफिसर आर्ट डी'एलिया यांनी सांगितले.

आतापासून 22 मे 2022 पर्यंच ऑनलाईन ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांनी स्वत: ऑर्डर पिक केल्यास 3 डॉलरचे कुपन कोड क्लेम (Claim) करू शकतात. पुढील आठवड्यात टॅक्स आणि ग्रॅज्युएटी लागू होण्यापूर्वी 5 डॉलर किंमतीची पुढील ऑर्डर देताना ग्राहक हा कोड वापरू शकतात.

''डॉमिनॉजने ही ऑर्डर अगदी योग्य वेळी सुरू केली आहे कारण वर्षातील सर्वात मोठा फुटबॉल गेम सुरू होणार आहे. डिलिव्हरी बॉईजसाठी या काळात वर्षातील सर्वात जास्त ऑर्डर असतात.''अशी माहितीही आर्ट डी'एलिया यांनी सुपर बाऊलबाबत बोलताना दिली.

सुपर बाउल हा राष्ट्रीय फुटबॉल लीग (NFL) चा अॅन्यअल चॅम्पियनशिप गेम आहे.

अलिकडच्या काही महिन्यांत, कोरोना व्हायरसच्या साथीमुळे आणि कामगारांचा तुटवडा निर्माण झाल्याने डॉमिनोच्या कमाईला मोठा फटका बसला होता. यूएस मधील पिझ्झा कंपनीच्या त्याच स्टोअरच्या विक्रीत 2021 च्या तिसर्‍या तिमाहीत 1.9% ची घट झाली आहे. ही कंपनीची दशकातील पहिली घसरण आहे.

सीईओ रिचर्ड अ‍ॅलिसन यांनी कमी होत चाललेल्या विक्रीचे कारण देशभरातील कामगारांचा तुटवडा असल्याचे सांगितले, ''ज्यामुळे कंपनीसाठी डिलिव्हरी ड्रायव्हर्सची कमरतरता निर्माण झाली. यूएसमध्ये कामगारांकडून येणाऱ्या राजीनाम्याची विक्रमी नोंद होत आहे. सप्टेंबर 2021 मध्ये देशाच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी 3% किंवा 4.4 दशलक्ष कामगारांनी नोकरी सोडली आहे.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT