kitchen hacks Solution to avoid milk overflows on gas  
फूड

Kitchen Hacks: कितीही लक्ष दिलं तरी दूध उतू जातं? 'या' टिप्स करा फॉलो

गॅसवर दुध उतू जाण हे अनेकजण शुभ मानतात. पण सारखं सारखं उतू जाण हे गृहिणींसाठी मोठी समस्या बनते.

सकाळ डिजिटल टीम

दूध तापवताना अनेकदा गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागते. नेहमी गॅससमोर उभे राहूनच दुध तापवावे लागतं. चुकून जरी आपण दुध तापनाच्या कालावधीत एखादे काम हाती घेतलं अन् त्या कामात गुंतलो की, दुधाचा गॅसवर अभिषेकच होतो. हा अनुभव प्रत्येक गृहिणीला आलाच असेल. अनेकवेळा यावरुन घरामध्ये टोमणेदेखील महिलांना ऐकावे लागतात.

गॅसवर दुध उतू जाण हे अनेकजण शुभ मानतात. पण सारखं सारखं उतू जाण हे गृहिणींसाठी मोठी समस्या बनते. कारण दुध उतू गेल्यामुळं अनेकांची चिडचिड होते. दुध उतू गेल्या गेल्या गॅससह ओटादेखील साफ करावा लागतो.

तसे केलं नाही तर घरात दुधाचा वास येऊ लागतो. त्यामुळं तुध तापवताना विशेष काळजी घेतली जाते. काही वेळी घरातील इतर सदस्यांना देखील गृहिणी दुधावर लक्ष ठेवायला सांगतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की यावरसुद्धा काही उपाय असु शकतात. तर या समस्येवरही उपाय आहेत. जाणून घेऊयात कोणते?

लाकडी चमचा

दुध उतू जाण्यापासून लाकडी चमचा तुमची मदत करेल. जेव्हा तुम्ही दूध उकळायला गॅसवर ठेवाल तेव्हा भांड्यावर लाकडी चमचा ठेवा. दुध बाहेर येणार नाही. परंतु हे लक्षात ठेवा की, कधीही स्टीलच्या चमच्याचा वापर करु नका.

मोठ्या भांड्यात दूध गरम करा

अनेकदा दूध उकळताना लोक लहान भांडी वापरतात. त्यामुळे दूध उकळल्यावर गॅसवर पडते. असे होऊ नये म्हणून नेहमी दुधासाठी मोठ्या भांड्याचा वापर करा. ज्यामुळे दूध उकळताना त्याला अतिरिक्त जागा मिळेल आणि दुध गॅसवर पडण्यापासून वाचेल.

बटरचा (लोणी) वापर करा

बटर (लोणी) तुम्हाला उकळत्या दुधाला भांड्यातून बाहेर पडण्यापासून रोखण्यास मदत करू शकते. जेव्हा जेव्हा तुम्ही दुध उकळण्यासाठी ठेवाल. तेव्हा त्या भांड्याचा काठाला बटर (लोणी) लावा. असं केल्याने भांड्याच्या गुळगुळीत कडा दूध बाहेर पडण्यापासून रोखतील.

डबल बॉयलर पद्धत वापरा

डबल बॉयलर पद्धत सामान्यतः चॉकलेट वितळण्यासाठी वापरली जाते. पण तुम्ही याचा उपयोग दुधासाठीही करु शकता. त्यासाठी मोठे भांडे एक चतुर्थांश पाण्याने भरावे. आता हे पाणी मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा, पाणी उकळू लागल्यावर त्यावर दुधाचे भांडे ठेवा. यामुळे दूध उकळायला थोडा वेळ लागेल, पण दूध कधीच बाहेर पडणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui murder case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतरही 'त्याचं' समाधान झालं नव्हतं; चक्क लीलावतीमध्ये...

Nagpur Accident: काॅंग्रेस नेते नितीन राऊत अपघातात बालंबाल बचावले, कारला ट्रकने धडक दिली अन्....

Mumbai Crime: गोराई बीचवरील हत्येचा उलगडा; मृतदेहाचे केले होते सात तुकडे, हातावरील टॅटूमुळे पटली ओळख

Children's Day Special Recipe: बालदिनानिमित्त मुलांसाठी बनवा चवदार रोटी पिझ्झा, सोपी आहे रेसिपी

Mumbai Police : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; रायचूरमधून गीतकाराला अटक

SCROLL FOR NEXT