Wholesale Masala Market in Mumbai: मसाले आणि गरम मसाल्यांशिवय भारतीय जेवण हे पूर्णच होवू शकत नाही. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या भागामध्ये वेगवगेळ्या प्रकारच्या मसाल्यांचा वापर करून जेवणाची Meal चव वाढवण्यात येते.
खरं तर प्रत्येक पदार्थाची चव ही त्यात वापरण्यात आलेल्या मसाल्यांवरच अवलंबून असते. यासाठीच घराघरांमध्ये खास करून उन्हाळ्यामध्ये Summer वर्षभरासाठीचा मसाला Maasala तयार केला जातो. Know about Mumbai Wholesale Masala Market
स्वयंपाकासाठी Cooking खास करून दोन प्रकारचे मसाले Massala वापरले जातात. यात वेगवेगळ्य़ा गरम मसाल्यांचा योग्य त्या प्रमाणात वापर करून गरम मसाला तसचं गोडा मसाला तयार केला जातो.
तर दुसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे लाल मिरच्यांपासून Red Chille तयार करण्यात आलेला लाल तिखट मसाला. या मसाल्यातही विविध प्रकारच्या लाल मिरच्यां आणि काही गरम मसाले वापरले जातात. प्रत्येक घरामध्ये हा मसाला वेगवेगळ्या तयार केला जातो.
वर्षभरासाठी मसाला तयार करण्यासाठी मिरच्या आणि गरम मसाल्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करावी लागते. यासाठी बाजारात चांगल्या प्रकारचं मसाल्याचं साहित्य खरेदी करावं लागतं.
आज आम्ही तुम्हाला मुंबईतील काही मोठे मसाला मार्केट सांगणार आहोत. जिथे तुम्हाला होलसेल दरात म्हणजेच स्वस्तात मस्त मसाले उपलब्ध होतील.
नवी मुंबई APMC- नवी मुंबईत सानपाडाजवळ असलेल्या APMC मार्केटमधील मसाला गल्लीत तुम्हाला सर्वात स्वस्त दरामध्ये सुकलेल्या लाल मिरच्यांच्या वेगवेगळ्या जाती, तसचं गरम आणि खडे मसाले होलसेल दरामध्ये उपलब्ध होतील.
सकाळी १० ते रात्री ९ या वेळेमध्ये हे मार्केट सुरु राहत. या बाजारामध्ये तुम्हाला गंटुर मिरची, ब्याडगी मिरची, काश्मिरी मिरची, संकेश्वरी, नंदीगढ मिरची अशा लाल मिरचीच्या वेगवेगळ्या जाती उपलब्ध होतील.
इथं मिरच्यांसोबतच तुम्हाला अख्खी हळद, धणे, जिरं, तसचं इतर सर्व खडे मसाले आणि चिंच, नारळ, शेंगदाणे या गोष्टी देखील कमी किमतीत मिळतील.
इथं बेडगी मिरची ३५० ते ५५०रुपये किलो अशा वेगवेगळ्या प्रतीची मिळेल. तर बेडही मिरची २२५पासून मिळेल. काश्मिरी मिरचीचा दर जवळपास ५५० ते ६०० रुपये प्रति किलो असा आहे.
हे देखिल वाचा-
२. लालबाग मसाला मार्केट- मुंबईतील लालबाग इथं असलेलं मसाला मार्केट हे अत्यंत जुन आणि मोठ मसाला मार्केट आहे. या मसाला मार्केटमध्ये जवळपास १५० ते २०० दुकानं आहेत.
इथं तुम्हाला सर्वच व्हरायटीच्या लाल मिरच्या अगदी कमी दरात म्हणजेच होलसेल दरात मिळतील. तसचं तुम्हाला स्वच्छ केलेल्या म्हणजेच निवडलेल्या मिरच्यादेखील मिळतील.
तसचं या बाजारामध्येच तुम्हाला मसाले कुटूनही मिळतील. तुमच्या पसंतीच्या मिरच्या आणि खड्या मसाल्यांची खरेदी करुन मसाला कुटून घेऊ शकता.
त्याच प्रमाणे तुम्हाला इथं उत्तम दर्जाचे विविध तयार मसाले मिळतील. मालवणी मसाला, घाटी मसाला, आगरी मसाला, सारस्वत स्पेशल मसाला, ब्राह्मण गोडा मसाला तसचं चिकन मटन मसाला असे विविध तयार मसालेदेखील तुम्हाला इथे मिळतील.
३. ठाणे मसाला मार्केट- ठाणे मसाला मार्केटमध्येही तुम्हाला लाल मिरचीच्या अनेक व्हरायटी, तसचं हळद आणि गरम मसाले तसचं खडे मसाले स्वस्त दरात मिळतील. तसचं तयार मसाले देखील मुबलक दरात मिळतील. या मसाला मार्केटमध्ये ही तुम्ही हवा असलेला मसाला तयार करून घेऊ शकता.
तसचं इथे तुम्हाला जिरं पावडर, धणे पावडर, तयार गरम मसाला पावडर मुबलक दरामध्ये उपलब्ध होतील. इथंही तुम्ही तुम्ही सामुग्रीची खरेदी करून मसाला कुटून घेऊ शकता. इथं मसाल्यांची एकूण ९० ते १०० दुकानं आहेत.
यासोबतच मस्जिद बंदरमध्ये देखील तुम्ही मसाल्यांची खरेदी करू शकता इथल्या मसाला मार्केटमध्ये देखील तुम्हाला स्वस्तात मस्त लाल मिरच्या, गरम मसाले आणि तय़ार मसाले देखील उपलब्ध होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.