stress reduce food  Sakal
फूड

Lok Sabha Election 2024: निवडणुकीच्या निकालाचे टेंशन येतय? तर 'या' पदार्थांचे करा सेवन

पुजा बोनकिले

Stress Reduce Food: आज लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीचा निकाल संध्याकाळपर्यंत लागणार असून कोण सत्तेत येणार आणि कोण विरोधी पक्षात बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक लोकांच्या मनात धाकधाकू तर अनेक लोकांना टेंशन येत आहे. अशावेळी टेंशन कमी करण्यासाठी पुढील पदार्थांचे सेवन करू शकता.

ग्रीन टी

तणाव कमी करण्यासाठी ग्रीन टी पिऊ शकता. ग्रीन टीमध्ये कॅफिन असतं आणि कॅफिन तणाव कमी करण्यास मदत करतो. तुम्ही काय खाता-पिता याकडे लक्ष दिले पाहिजे. ग्रीन टी प्यायल्याने तणाव नियंत्रणात ठेवता येतो. ग्रीन टीमध्ये एल थियानिय हे अमिनो अॅसिड असते ज्यामुळे डोक शांत राहते.

डार्क चॉकलेट

लोकसभा निवडणूकीच्या निकारालाचे टेंशन येत असेल तर चॉकलेट खावे. गोड खाल्ल्याने मन आणि डोक शांत राहते. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉअड्स असतात यामुळे मुड चांगला होतो. तज्ज्ञ देखील तणावात असताना गोड पदार्थ खाण्याचा सल्ला देतात.

बेरी

तुम्हाला तणाव कमी करायचा असेल तर बेरी खाऊ शकता. बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी किंवा रास्पबेरी हे असं सतत खात राहिलं की तणाव दूर होतो, तणावाची पातळी कमी होते. बेरी स्मूदी बनवून पण तुम्ही पिऊ शकता.

पालेभाज्या

पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पालेभाज्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. यामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. मॅग्नेशियममुळे तणाव कमी करण्यास मदत मिळते. यामुळे तुम्हालाही लोकसभा निवडणूकीच्या निकालांचे टेंशन येत असेल तर पालेभाज्यांचे सेवन करू शकता.

सुकामेवा

सुकामेवा म्हणजे बदाम, अक्रोड, काजू आणि पिस्ता खाऊ शकता. तुम्ही हे पदार्थ काम करतांना किंवा चालताना देखील खाऊ शकता. तणाव दूर करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. जर तुम्हाला टेंशन येत असेल तर बदाम अक्रोड आणि पिस्ता खाऊ शकता. कारण यामध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण जास्त असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT