Nashik Famous Chivda  sakal
फूड

Maharashtra Din : नाशिकच्या चिवड्याचे नेहरूही होते फॅन; वाचा कोंडाजी चिवडा कसा झाला फेमस?

चटकदार आणि खमंग असणारा नाशिकचा चिवडा कित्येक वर्षांपासून नाशिकचं नावलौकीक वाढवत आहे.

निकिता जंगले

Nashik Famous Chivda : महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जगभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक आगळी वेगळी खाद्यसंस्कृती आहे. प्रत्येक जिल्हा त्याच्या विशेष खाद्यपदार्थाने ओळखला जातो. मग नागपूरचं सावजी मटण असो की पुण्यातील बाकरवडी, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा असो की जळगावची केळीचे चिप्स असो, सोलापूरची शेंगदाण्याची चटणी असो की आणखी काही...प्रत्येक जिल्हा हा एका विशेष खाद्यपदार्थाची ओळख आहे.

आज आपण नाशिकातील अशाच एका हटके खाद्यपदार्थाविषयी जाणून घेणार आहोत. (Maharashtra Din Nashik Famous Chivda history loved by Pandit Jawaharlal Nehru )

नाशिकचा चिवडा

नाशिक म्हटलं की डोळ्यासमोर येतो नाशिकचा चिवडा. नाशिकची खास ओळख असलेल्या या चिवड्याची टेस्ट अनेकांच्या जिभेवर रेंगाळत असते. चटकदार आणि खमंग असणारा नाशिकचा चिवडा कित्येक वर्षांपासून नाशिकचं नावलौकीक वाढवत आहे.

नाशिकचा चिवडा तुम्हाल शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सापडणार पण तुम्हाला माहिती आहे का नाशिकचा चिवडा फेमस कसा झाला? या चिवड्याचा काय इतिहास आहे? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

नाशिकचा चिवडा म्हटलं की दोन नावे नाशकातील चिवड्यासाठी खूप फेमस आहे. एक म्हणजे कोंडाजींचा चिवडा तर दुसरा म्हणजे माधवजींचा चिवडा. या दोन चिवडेकरांनी नाशिकची ही आगळी वेगळी ओळख बनवली.

१९२० च्या सुमारास वावरे बंधूंनी नाशिकमध्ये कोंडाजी चिवडा सुरू केला होता. कोंडाजी वावरे हे सुरवातीला एका टोपलीत चिवडा विकायचे. कोंडाजी चिवडा कमी कालावधीत लोकांच्या पसंतीस उतरला आणि नाशिकचा फेमस चिवडा झाला.

कोंडाजी चिवडा सुरू झाल्यानंतर साधारण पाच सहा वर्षानंतर मोरे बंधूंनी नाशिकमध्ये माधवजीचा चिवडा सुरू केला. कोंडाजी चिवडाला टक्कर देणारा हा चिवडा तितकाच टेस्टी होता. त्यामुळे आजही कोंडाजी आणि माधवजी चिवडा नाशिकमध्ये तितकाच नावाजलेला आहे.

नाशिकच्या चिवड्याची टेस्ट नेहरूंनी चाखली होती

१९५० या वर्षी गुजरातच्या गांधीनगर येथे अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाच्या वेळी नाशिकचे नेते भाऊसाहेब हिरे यांनी पंडित नेहरूंना नाशिकच्या चिवड्याची ओळख करून दिली. कोंडाजींचा फेमस चिवडा त्यांनी पंडित नेहरूंना चाखायला दिला होता. त्यावेळी नेहरूंंना या चिवड्याची टेस्ट प्रचंड आवडली होती.

नाशिकचा चिवडा हा नाशिकमध्ये आणि नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यंटकांना खुश करतो. त्यांच्या जीभेची चव वाढवतो. या चिवड्याने आपले जाळे महाराष्ट्रसह देशभर पसरवले आहे.

आज आपण हा चिवडा घरी कसा बनवायचा, याविषयी जाणून घेणार आहोत.

साहित्य:

  • अर्धा किलो भाजके पोहे

  • तेल

  • साखर

  • सुक्या खोबऱ्याचे काप एक वाटी

  • दीड वाटी शेंगदाणे

  • दीड वाटी डाळ्या

  • चार ते पाच कांदे

  • तिखट

  • कढीपत्ता

  • मनुका (आवडीनुसार)

  • मीठ

  • तीन-चार आमसुले

  • लवंग, दालाचिनी, जिरे, शहाजिरे, धने, तमालपत्र, दगडफूल, मिरे, बडीशेप, तीळ हिंग हे सर्व मसाल्याचे पदार्थ प्रत्येकी १० ग्रॅम

nashik chivda

कृती

  • सर्वप्रथम कांदा उभा चिरून तो मस्त कोरडा करून घ्यावा.

  • मसाल्याचे साहित्य प्रत्येकी समप्रमाण घेऊन, ते सर्व जिन्नस तेलावर वेगवेगळे भाजून एकत्र बारीक करावेत आणि त्याचा मसाला तयार करून घ्यावा.नंतर खोबऱ्याचे बारीक काप करून घ्यावेत.

  • पोहे स्वच्छ निवडून घ्यावेत. तेल घेऊन त्या तेलात कांद्याचे काप, खोबऱ्याचे काप, आमसुले व शेंगदाणे वेगवेगळे तळून घ्यावेत.

  • नंतर तेल खाली उतरवून, त्या तेलात चवीप्रमाणे मीठ व तिखट, हळद, तळलेली आमसुले बारीक चुरून घालावीत.

  • तयार केलेला मसाला, दाणे, खोबऱ्याचे काप, कांद्याचे काप व डाळे हे सर्व घालून चांगले कालवावे.

  • पोहे आणि चवीनुसार साखर घालून परत चांगले एकत्र करून घ्यावे अशा रितीने आपला चिवडा तयार झालेला आहे. हा चिवडा हवाबंद डब्बात ठेवावा.जेणेकरून तो वातड होणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT