Make Oregano Seasoning At Home With A Few Ingredients  
फूड

Oregano Seasoning Recipe: पिझ्झा सोबत छोट्या पाकीटात मिळणारे ओरेगॅनो आता घरीच बनवा

सकाळ डिजिटल टीम

पिझ्झा असो वा पास्ता ओरेगॅनोशिवाय पुर्ण होत नाही. जेव्हा जेव्हा आपण बाजारातून पिझ्झा ऑर्डर करतो तेव्हा आपण त्यासोबत भरपूर पिझ्झा सिजनिंग घेतो. विशेषतः ओरेगॅनो. ओरेगॅनो हे चवीला फारच छान लागत. अनेक पदार्थांमध्ये ओरेगॅनो घातल्याने त्या डिशची चव अनेक पटींनी वाढते. तर हे पिझ्झा सोबत छोट्या पाकीटात मिळणारे ओरेगॅनो बनते तरी कसे जाणून घेऊ.

आपण सर्वात आधी ओरेगॅनो नेमकं काय हे जाणून घेऊ?

ओरेगॅनो ही एक वनस्पती आहे. ओरेगॅनो हे औषधी वनस्पतींपैकी एक आहे. हे सामान्यतः पिझ्झा, पास्ता आणि गार्लिक ब्रेड सारख्या पदार्थांना चव देण्यासाठी वापरले जाते. ओरेगॅनो मसाला तयार करताना कोरड्या ओरेगॅनोची पाने औषधी वनस्पतींमध्ये मिसळली जातात. ओरेगॅनो दिसताना तुळशी आणि पुदिन्याच्या पानांप्रमाणेच दिसते. हे खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.

तर जाणून ओरेगॅनो मसाल्याची रेसिपी

साहित्य

२ टीस्पून वाळलेल्या ओरेगॅनो

१ टीस्पून ड्राय तुळस

१ टीस्पून काळी मिरी पावडर

१ टीस्पून चिली फ्लेक्स

१ टीस्पून मीठ

१ टीस्पून क्रिस्पी लसूण

कृती

कढईत तेल गरम करा. मंद आचेवर लसूण सोनेरी होईपर्यंत शिजवा. लसूण थोडा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. चाळणीत चाळून घ्या आणि नंतर टिश्यू पेपरवर ठेवा जेणेकरुन तेल कमी होईल. त्यात तुळशीची कोरडी पाने बारीक करा.

नंतर पाने कुस्करून काळी मिरी, चिली फ्लेक्स, मीठ, ओरेगॅनो घालून पुन्हा मिक्स करा. थंड झाल्यावर तुम्ही ते एका काचेच्या एअर टाइट डब्यात भरुन ठेवा. ३ ते ४ महिने रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: चीनमुळे भारतीय शेअर बाजारात कोसळतोय का? FII ने विकले 15,243 कोटी रुपयांचे शेअर्स

Ambabai Mandir : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 1 लाख 34 हजारहून अधिक भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन

हिंदू धर्मीयांचा हिंसक असा उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी, मगच..; काय म्हणाले महाडिक?

Navratri 2024 : वरीचा भात, खिडचीची चव वाढवेल उपवासाची दाण्याची आमटी, रेसिपी पण लगेचच होणारी

MSRTC : तुळजापूरसाठी राज्यभरातून १ हजार २६५ बस, महामंडळाचे नियोजन; लालपरी सज्ज

SCROLL FOR NEXT