पुदिना ताक Esakal
फूड

पुदिना Buttermilk थंडावा देण्याबरोबरच पोटाच्या समस्याही सोडवेल

ताक Buttermilk पिण्याचे अनेक फायदे आहेत. प्रत्येक घरामध्ये ताक बनवण्याची वेगळी पद्धत असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला पुदिन्याच्या Mint ताकाबद्दल सांगणार आहोत

Kirti Wadkar

उन्हाळ्यातमध्ये अनेकजण ताक पिणं पसंत करतात. थंडगार ताक प्यायल्याने पोटाला शांत वाटतं. ताक प्यायल्याने पोटाचा मेटाबोलिक रेट वाढतो. तसचं ताकामुळे पचन होण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी ताक फायदेशीर ठरतं. तसचं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हायड्रेट Hydrate राहण्यासाठी आणि पोटाशी Stomach संबंधतीत समस्या दूर करण्यासाठी ताक उपयुक्त ठरतं. Marathi Health Tips for Summer try Pudina Buttermilk

ताक Buttermilk पिण्याचे अनेक फायदे आहेत. प्रत्येक घरामध्ये ताक बनवण्याची वेगळी पद्धत असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला पुदिन्याच्या Mint ताकाबद्दल सांगणार आहोत. पुदिना ताकामुळे आतड्यांचं कार्य सहज आणि जलद होण्यास मदत होते. या पुदिना ताकाचे इतरही काही फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला या पुदिना ताकाचे फायदे आणि ते बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. 

पुदीना ताक रेसिपी mint buttetrmilk recipe in hindi

पुदीना ताक बनवण्याची रेसिपी अगदी सोपी आहे. हे ताक तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता. यात पहिल्या रिसिपीत तुम्ही पुदिन्याची पानं खलबत्यामध्ये वाटून घ्या. नेहमीच्या ताकामध्ये ही वाटलेली पानं टाका. अशा प्रकारे तुमचं पुदीना ताक तयार होईल.

किंवा तुम्ही एका मिक्सरच्या भांड्यात ताक किंवा २ चमचे दही आणि ग्लासभर पाणी घ्या. त्यात मुठभर पुदिन्याची पानं, जीरं पावडर, एक लहान आल्याचा तुकडा आणि काळं मीठं टाका. त्यानंतर मिनटभरासाठी मिक्सर सुरु करुन एकजीव होऊ द्या. यानंतर तुमचं पुदिना ताक तयार होईल हे ताक गाळून तुम्ही .थंडगार पुदिना ताकाची तुम्ही मजा लुटू शकता.

आरोग्यासाठी फायदेशीर असलेलं हे ताक अगदी चविष्ट लागतं. पुदिना ताकाचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे आहेत हे पाहुयात.

१. शरीर डिटॉक्स होईल- उन्हाळ्याच पुदिन्याच्या ताकाचं सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. म्हणजेच यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. पुदीना कात आतडे स्वच्छ करून शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे आतड्यांशी संबंधीत समस्या सहज दूर होतात.

२. पोटाला थंडावा- उन्हाळ्यामध्ये वाचावरणातील वाढत्या तापमानामुले तसचं उष्माघातामुळे पोटासंबधी अनेक तक्रारी उद्धवतात. अशात पुदीना ताक प्यायल्याने पोट थंड राहत आणि पोटोसंबधीच्या समस्या कमी होतात. तसचं शरीराचं मेटाबोलिज्म म्हणजेच चयापचय क्रिया जलद होवून अन्न पचन चांगलं होतं.

३. उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत- हाय बीपी म्हणजेच रक्तदाब वाढल्यास पुदिन्याच्या ताकाचं सेवन फायदेशीर ठरतं. यामुळे रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत होते. पुदिन्याच्या ताकामुळे नसांना आराम मिळतो आणि रक्त वाहिन्या स्वच्छ होण्यास मदत होते.

४. पोटातील गॅस कमी करण्यास उपयुक्त- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पचनासंबधी समस्या निर्माण झाल्याने अनेकदा गॅसचा त्रास होवू शकतो. खास करून उन्हाळ्यात तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने गॅसची समस्या वाढते आणि पित्त देखील होतं. अशावेळी पुदिन्याचं ताक प्यावं. 

या ताकाच्या सेवनामुळे पोटातील गॅसची समस्या दूर होते आणि अन्न पचण्यास मदत होते. पुदीना आणि ताक पोटातील जळजळ कमी करण्यास मदत करतं.

५. अॅनिमियावर उपयुक्त- उन्हाळ्यात पुदिन्याचं ताक प्यायल्यास अॅनिमियाचा त्रास कमी होतो आणि शरीरातील थकवादेखील दूर होतो. या ताकाच्या सेवनामुळे भूक वाढते आणि थकवा नाहिसा होतो. उन्हाळ्यात खास करून दुपारच्या जेवणात पुदिना ताकाचं सेवन करावं. 

पुदिना ताकामुळे एसिडीटीची समस्या कमी होते. तसचं शरीर हायड्रेट राहण्यास मदत होत असल्याने तुमच्या त्वचेसाठीदेखील हे फायदेशीर आहे. संध्याकाळनंतर पुदिना ताकाचं सेवन टाळावं. दुपारच्या जेवणात किंवा दुपारी तुम्ही या ताकाचं सेवन करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इतर कार्बोनेटेड शीत पेय पिण्याऐवजी पुदिना ताक हा एक उत्तम हेल्दी पर्याय आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT