Tips To Store Milk Esakal
फूड

Tips To Store Milk: दूध या भांड्यात साठवा, नासण्याची शक्यता होईल कमी

दिवसभर दुधाचा सतत वापर होत असल्याने ते सतत फ्रिजमधून बाहेर काढलं जातं. सतत तापमान बदलल्याने दूध नासण्याची शक्यता वाढते. परिणामी अनेकदा अचानक दूध नासल्याने मोठी अडचण निर्माण होते. हे टाळण्यासाठी तुम्ही काही ट्रीक वापरू शकता

Kirti Wadkar

Tips To Store Milk: उन्हाळ्यामध्ये जास्त तापमानामुळे Temprature अनेक शिजवलेले पदार्थ नासण्याची किंवा खराब होण्याची शक्यता जास्त असते. यातही खास करून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असलेलं दूध Milk. उन्हाळ्यात आपण जरी फ्रिजमध्ये दूध ठेवत असलो तरी ते खराब होण्याची शक्यता असते. Marathi Tips how to avoid milk wasting in summer season

खरं तर दूध Milk हा प्रत्येकाच्याच घरामध्ये लागणारा आवश्यक पदार्थ आहे. सकाळच्या चहासाठी Morning Tea तसचं लहान मुलांसाठी एखादी स्विट डीश तयार करण्यासाठी प्रत्येकजण घरात दूध आणत असतात.

दिवसभर दुधाचा सतत वापर होत असल्याने ते सतत फ्रिजमधून बाहेर काढलं जातं. सतत तापमान बदलल्याने दूध नासण्याची शक्यता वाढते. परिणामी अनेकदा अचानक दूध नासल्याने मोठी अडचण निर्माण होते.

हे टाळण्यासाठी तुम्ही काही ट्रीक वापरू शकता. योग्य भांड्यामध्ये जर तुम्ही दूध ठेवलं तर ते नासण्याची शक्यता कमी होते किंवा ते नासत नाही. म्हणूनत दुधासाठी कोणतं भांड वापरावं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काचेची बाटली किंवा जग- उन्हाळ्याच्या दिवसांमध्य दूध नासून होणारं नुकसान टाळण्यासाठी तुम्ही काचेच्या बाटलीचा किंवा जगचा वापर करू शकता. यासाठी दूध चांगलं उकळल्यानंतर ते गार होवू द्या त्यानंतर काचेच्या बाटलीत किंगा जगमध्य भरून फ्रिजमध्ये ठेवा. यावेळी बाटली किंवा जग झाकणाने बंद राहिल, याची काळजी घ्या.

हे देखिल वाचा-

दूध स्टोअर करण्यासाठी काचेच्या बाटलीचा किंवा जगचा वापर केल्यास फ्रिजमधून दूध कितीही वेळा बाहेर काढून आत ठेवलं तरी ते खराब होणार नाही. शिवाय जास्त दिवस फ्रिजमध्ये राहिल आणि दूधाची चवही बदलणार नाही.

स्टीलचं भांडं- दूध तापवण्यासाठी आणि ते स्टोअर करण्यासाठी स्टीलचं भांडं हा एक उत्तम पर्याय आहे. स्टीलच्या भांड्यात तुम्ही जवळपास एक आठवड्यापर्यंत दूध फ्रिजमध्ये स्टोर करू शकता. तसचं दुधाची चवही बदलत नाही.

यासाठी मात्र तुम्ही दुधासाठी वापरायची पातेली वेगळी ठेवणं गरजेचं आहे. दुधासाठी वापरण्यात येणारं पातेल. आमटी, भाजी असे इतर पदार्थ तयार करण्यासाठी वापरू नये. तसचं प्रत्येकवेळी ते स्वच्छ धुवावं.

प्लॅस्टिकचे कॅन- दूध ठेवण्यासाठी बाजारामध्ये प्लॅस्टिकचे कॅन उपलब्ध असतात. या कॅनमध्ये दूध भरून ठेवण्याआधी दूध चांगलं तापवून घ्यावं. त्यानंतर ते गार करून कॅनमध्ये भरून ठेवावं. यामुळे दूध ३-४ दिवस चांगलं राहतं. अर्थात प्रत्येकवेळी कॅन स्वच्छ धुणं गरजेचं आहे.

अशा प्रकारे योग्य भांड्याची निवड केल्यास दूध जास्त दिवस चांगलं राहिल. तसचं काही भांडी दूध स्टोर करण्यासाठी कायम टाळावी. यातील काही भांड्यांच्या वापरामुळे दूध नासण्याची शक्यता तर असतेच शिवाय काही वेळेला पोटदूखी किंवा विषबाधा होण्याचा धोकाही असतो. यामुळेच दूध ठेवण्यासाठी कोणती भांडी वापरू नये ते पाहुया

तांब्याचं भांड- दूध तापवण्यासाठी किंवा ते फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी देखील तांब्याच्या भांड्याचा वापर टाळावा. ताब्याच्या भांड्याच दूध ठेवल्याने त्यात आयरनचं प्रमाण वाढू शकतं. तसचं दुधातील रसायनांशी त्याची प्रक्रिया होवून दूध नासण्यासोबतच ते विषारी बनू शकतं.

पितळेचं भांड- पितळेच्या भांड्यात ७० टक्के तांब्याचं प्रमाण आढळतं. त्यामुळेच पितळेच्या भांड्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असलेले कोणतेही अन्न पदार्थ ठेवणं हानिकारक ठरू शकतं.

दूधामध्ये मोठ्या प्रमाणात लॅक्टिक ऍसिड असल्याने पितळेच्या भांड्यातील दूध लवकर नासण्याची शक्यता असते. तसचं यामुळे विषबाधा होण्याचा धोका देखील वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT