Masala Dosa Rava Dosa and Mysore Dosa different of their dosa tips food marathi news 
फूड

मसाला डोसा, रवा डोसा आणि म्हैसूर डोसा तिन डोसामध्ये काय फरक आहे जाणून घ्या

अर्चना बनगे

कोल्हापूर : दक्षिण भारतातील अनेक खाद्यपदार्थ  स्वादिष्ट  आणि लोकप्रिय आहेत.  यातील डोसा हा पदार्थ फक्त भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. वास्तविक हा मेनू दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध पदार्थ आहे. हे तयार करण्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ याचा वापर केला जातो. दक्षिण भारत मध्ये मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन होते. त्यामुळे या तांदळापासून वेगवेगळे खाद्यपदार्थ करण्याची संस्कृती या भागाने जपली आहे.

जगातील टॉप 50 मधील सर्वात टेस्टी फूड मध्ये  डोसा चा समावेश होतो. डोसा तयार करण्याची पद्धत आणि त्याची चव यामुळे टॉप टेन टेस्टी फूड मध्ये सुद्धा हा पदार्थ सामील आहे. भारतामध्ये डोसा तयार करायचे अनेक प्रकार आहेत. यातील मसाला डोसा, रवा डोसा आणि म्हैसूर डोसा सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

काय आहे फरक जाणून घ्या

मसाला डोसा : उडीद डाळ आणि तांदूळ या पासून बनवला जातो. ज्यामध्ये कांदा आणि बटाटा याचे मिश्रण करून ते वापरले जाते.


रवा मसाला डोसा : हा सुद्धा अन्य डोसा प्रमाणेच तयार केला जातो. परंतु यामध्ये रवा मिक्स करण्यात येतो. तसेच यामध्ये मिरची आणि कांदा याचे मिश्रण वापरले जाते.
 

मैसूर मसाला डोसा:  हा मसाला डोसा सारखेच तयार करण्यात येतो. परंतु यामध्ये कांदा, लाल मिरची आणि टोमॅटो  याची पेस्ट वापरली जाते. त्याच बरोबर हे भाजून घेताना ताज्या नारळाचा वापर केला जातो जे लोकांना अत्यंत आवडते यासाठी अनेक जण म्हैसूर डोसा ऑर्डर करतात.

रवा मसाला डोसा तयार करण्याची पद्धत अन्य डोसा पेक्षा अत्यंत वेगळी आहे. हे खास करून रव्या पासून बनवले जाते. हा डोसा तयार करताना पीठ भिजवून ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे जर तुम्हाला डब्या मध्ये घेऊन जाण्यासाठी झटपट तयार करायचे असेल तर हा डोसा तुम्ही करू शकता. बनवण्याची पद्धत आणि त्याची चव इतर डोसा पेक्षा वेगळी आहे. त्याचबरोबर यामध्ये वापरले जाणारे पदार्थही वेगळे आहेत. कुरकुरीत स्वादा मुळे हा डोसा लोकांना अधिक प्रिय ठरतो.

म्हैसूर मसाला डोसा हा अन्य साउथ इंडियन डोसा पेक्षा वेगळा पदार्थ आहे. काही भागामध्ये हे पातळ व खुसखुशीत बनवले जाते.  यामध्ये बटाट्याची भाजी घालण्यापूर्वी हा डोसा भाजताना त्यावर लाल मिरची आणि लसूण ची पेस्ट टाकली जाते. त्याचबरोबर भाजी आणि डोसाच्या मध्ये बटर चा एक तुकडा ही टाकला जातो. जेव्हा डोसा तयार होतो तेव्हा तो नारळाच्या चटणी बरोबर खाण्यासाठी दिली जाते. चटपटीत खाणारे म्हैसूर डोसा ला अधिक पसंती देतात.

मसाला डोसा,रवा डोसा आणि मैसूर मसाला डोसा च्या तुलनेत मसाला डोसा बनवणे अत्यंत सोपे आहे. तसेच ज्यांना तेल आणि मसाल्याचे पदार्थ नको आहेत ते याला अधिक पसंती देतात. हा डोसा तयार करण्यासाठी  तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर केला जातो. त्याचबरोबर यासोबत भाजीसाठी कांदा आणि बटाट्याचा वापर होतो. सकाळी नाश्ता मध्ये याच डोसा ला अधिक पसंती दिली जाते. कारण हे शरीरासाठी पोषक आणि झटपट तयार होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh Attack: अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांनी व्यक्त केली 'ही' भीती, म्हणाले- राज्यातील कायदा सुव्यवस्थाच...

Nashik Traffic Route: मतमोजणीसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे नियोजन

Google Crome Sell : क्रोम ब्राऊजर विकून टाका! US मधून गुगलच्या मालकांना आला फोन, नेमकं प्रकरण काय?

Eye Care Tips : दुषित हवेचा डोळ्यांवर होतोय थेट परिणाम, डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छ. संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुक प्रचार, उमेदवारांच्या दुचाकी फेरीमुळे मार्ग खोळंबले

SCROLL FOR NEXT