हिवाळ्यात गरमागरम जेवणात टेस्टी आणि हेल्दी असं काही मेन्यू राहला की जेवणाची मजा येते. या टेस्टी जेवणात जर भाकरी झुणका किंवा आमटी राहली तर मेजवाणीचं होते. हिवाळ्यात अनेकजण गरमागरम आमटीचा आहारात समावेश करतात.
आज आपण टेस्टी आणि हेल्दी मिश्र कडधान्याची आमटी कशी करायची, याविषयी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
साहित्य :
प्रत्येकी पाव वाटी चवळी
मूग व राजमा
चवीनुसार मीठ
आलं
लसूण वाटण
दोन टी स्पून भरून लाल तिखट
एक टी स्पून
गरम मसाला पाव टी स्पून
एक कांदा बारीक चिरून
कोथिंबीर
फोडणीसाठी तीन टी स्पून तेल
मोहरी
हिंग
हळद
कृती :
रात्री गार पाण्यात चवळी, अख्खे मूग, राजमा एकत्रच भिजत घालावे.
सकाळी प्रेशर कुकरमध्ये नेहमीप्रमाणे शिजवून घ्यावे.
डावाने चांगले घोटून घ्यावे. वाटल्यास थोडे गरम पाणी घालून सारखे करून घ्यावे.
त्यात चवीनुसार मीठ व तिखट घालावे.
कढईत तेल घालून ते तापले की गॅस बारीक करावा व मोहरी, हिंग, हळद खमंग फोडणी करून घ्यावी व त्यावर कांदा घालून परतावा.
त्यावर कडधान्यांचे घोटलेले मिश्रण ओतून सारखे करावे.
गॅस मोठा करून एक उकळी आणावी. गरम मसाला व कोथिंबीर घालून गॅस बंद करावा व वर लगेच झाकण ठेवावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.