Moong Dal Khichdi Recipe Esakal
फूड

पावसाळ्यात वजन कमी करताय? मग मुगडाळीची खिचडी जरुर खा!

दिपाली सुसर

भारतीय आहारात डाळ खिचडी हा सर्वात लोकप्रिय पदार्थ मानला जातो. जवळ जवळ सर्वच घरांमध्ये डाळ खिचडी हमखास बनवली जाते. जर तुम्हाला पावसाळ्यात खाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय हवा असेल तर मुग डाळ खिचडीसारखा उत्तम पर्याय नाही. आज आम्ही तुम्हाला मुग डाळ खिचडीची रेसिपी आणि मुगाची डाळ फायदे सांगणार आहोत.

साहित्य:

दोन वाटी मूग डाळ

दिड वाटी तांदूळ

एक बारीक चिरलेले टोमॅटो

एक बारीक चिरलेले गाजर

बारीक चिरलेली कोबी

वटाणे

लसूूण आल्याची पेस्ट

एक दोन चिरलेल्या हिरवी मिरची

एक चमचे तूप

कोथिंबीर

मीठ

तिखट

हळद

हिंग

जिरे

कृती:

कुकरमध्ये मुग डाळ भाजून त्यात स्वच्छ धुतलेले तांदूळ व पाणी घाला. पाण्याला उकळी फुटू लागताच त्यात हळद व मीठ मिक्स करा. कुकरमध्ये मुग डाळ घालून भाजून घ्या. आता त्यात स्वच्छ धुतलेले तांदूळ व पाणी घाला. पाण्याला उकळी फुटू लागताच त्यात हळद व मीठ मिक्स करा. सर्व सामग्री शिजवण्यासाठी कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करा.

साजूक तूपात हिंग, जीरे, आलं-लसूण पेस्ट गाजर, कोबी, हिरवे वाटाणे घालून सर्व सामग्री चांगली मिक्स करा.

एका पॅनमध्ये साजूक तूप घेऊन त्यात हिंग, जीरे, आलं-लसूण पेस्ट घाला आणि चांगलं परतून घ्या. आता त्यात बारीक चिरलेले गाजर, कोबी, हिरवे वाटाणे घालून सर्व सामग्री चांगली मिक्स करा.

आता त्यात शिमला मिरची, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, मीठ, हळद, लाल तिखट पावडर घाला

आता त्यात चिरलेले टोमॅटो, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, 1 चमचा लाल तिखट पावडर घालून 3 ते 4 मिनिटे मध्यम आचेवर सर्व सामग्री शिजवून घ्या. डाळ व तांदळाच्या मिश्रणात फ्राय केलेल्या भाज्यांचे मिश्रण घालून सर्व सामग्री चांगली एकजीव करा.कुकर थंड झाल्यानंतर, शिजवलेल्या डाळ व तांदळात पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा.आता डाळ व तांदळाच्या मिश्रणात फ्राय केलेल्या भाज्यांचे मिश्रण घालून सर्व सामग्री चांगली एकजीव करा. तयार झाली आहे आपली टेस्टी व हेल्दी मुग डाळ खिचडी गरमा गरम डाळ खिचडी सर्व्ह करताना त्यात बटर किंवा साजूक तूप घाला. या खिचडीचा आस्वाद तुम्ही कोशिंबीर, हिरवी चटणी, लोणचं व पापडासोबत घेऊ शकता.

आता बघूया मुगाची डाळ खाण्याचे फायदे काय आहेत?

● वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरु असतील तर मुगाची डाळ आहारात अवश्य असावी. मुगाच्या डाळीत कॅलरीज ( उष्मांक) कमी असतात. त्यामुळे मुगाची डाळ खाल्ल्यानं वजन नियंत्रित राहातं.

● वजन कमी करण्यासाठी मुगाची डाळ वरण, सूप, मोड आलेले अख्ख्या मुगाची उसळ आणि पौष्टिक खिचडीच्या स्वरुपात खाता येते.

● मुगाच्या डाळीत असलेले लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, ब जीवनसत्व, प्रथिनं हे पोषक घटक शरीरातील अशक्तपणा दूर करुन ऊर्जा निर्माण करतात.

● दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहावी यासाठी मुगाची डाळ खाण्याला महत्व आहे.

● शरीरातील कोलेस्ट्राॅल वाढल्यावर मुगाची डाळ खाणं फायदेशीर ठरतं. मुगाच्या डाळीमुळे शरीरात जास्त झालेलं कोलेस्ट्राॅलचं प्रमाण निय्ंत्रणात येतं.

● पचनासाठी मुगाची डाळ सर्वात उत्तम मानली जाते. मुगाची डाळ पचण्यास हलकी असते. पचन क्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी, सुधारण्यासाठी आहारात मुगाच्या डाळीला महत्व आहे.

● मुगाची डाळ खाल्ल्याने पोटातील उष्णता कमी होते. उन्हाळ्यात दिवसात मुगाच्या डाळीचं सूप पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

● मुगाच्या डाळीत दाह आणि सूजविरोधी घट्क असल्याने उष्माघात, शरीराचं तापमान वाढणं , तहान लागणं या उन्हाळ्यातल्या समस्यांचा धोका टळतो.

● मुगाचं सूप प्याल्यानं उष्माघाताचा धोका टाळण्याइतका ओलावा शरीरात निर्माण होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT