Morning Breakfast Recipe: Sakal
फूड

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा कडधान्यांचे पौष्टिक ब्रेड रोल, नोट करा रेसिपी

Morning Breakfast Recipe: तुम्हाला सकाळी नाश्त्यात काही पौष्टिक खायचे असेल तर कडधान्यांपासून ब्रेड रोल तयार करू शकता.

पुजा बोनकिले

सकाळ साप्ताहिक- निलीमा शंकर कर्वे

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्ता करणे फायदेशीर असते. यामुळे दिवसभर थकवा जाणवत नाही. सकाळी नाश्त्यात फक्त कडधान्य न खाता तुम्ही पौष्टिक ब्रेड रोल बनवू शकता. हे आरोग्यासाठी फायदेशीर असून पोट देखील भरलेले राहते. तसेच शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. कडधान्यांचे पौष्टिक ब्रेड रोल बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत काय आहे हे जाणून घेऊया.

कडधान्यांचे ब्रेड रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ब्रेड स्लाइस

मोड आलेली मिक्स कडधान्ये

लसूण-आले-हिरवी मिरची पेस्ट

चवीनुसार मीठ

तेल

कोथिंबीर

बटर

दोन उकडलेल्या बटाट्यांची पेस्ट

कडधान्यांचे ब्रेड रोल बनवण्याची कृती

कडधान्यांचे ब्रेड रोल बनवण्यासाठी सर्वात आधी मोड आलेली मिक्स कडधान्ये कुकरमध्ये शिजवून घ्यावीत.

त्यानंतर त्यामध्ये आले-मिरची-लसूण-बटाटा पेस्ट मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे करावेत.

ब्रेडच्या कडा कापून घ्याव्यात.

कापल्यानंतर उरलेला ब्रेड पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने लाटून घ्यावा.

या लाटलेल्या ब्रेडमध्ये कडधान्यांचे मिश्रण एक चमचा घालून करंजीप्रमाणे किंवा पोळीचा रोल करतो त्याप्रमाणे गुंडाळून घ्यावे.

हलकेच पाणी लावून ब्रेडच्या कडेचा भाग बंद करून घ्यावा.

तयार झालेले ब्रेड रोल तव्यावर बटर घालून भाजावेत.

कडधान्यांचे गरमागरम ब्रेड रोल तयार.

हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा शेजवान सॉसबरोबर खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT