mustard benefits for skin tips food marathi news 
फूड

 आहारात वापर करा मोहरीचे तेल यामुळे मिळतील अनेक जबरदस्त फायदे 

अर्चना बनगे

कोल्हापूर : अनेक घरामध्ये आजही स्वयंपाक तयार करताना मोहरी तेलाचा वापर केला जातो. या तेलामुळे आपल्या शरीराला मोठा फायदा होतो. 

मोहरीतेलाची वैशिष्ट्ये 
* मोहरी तेलामुळे आपल्याला होणार्‍या इन्फेक्शन  पासून आपण वाचू शकतो.
 * ज्या लोकांना भूक कमी लागते त्यांनी मोहरी तेलाचा वापर करावा.
 * मोहरी तेल हे त्वचेसाठी ही अत्यंत फायदेशीर असते.

आपल्या स्वयंपाक घरात खाद्यपदार्थ निर्मितीसाठी अनेक तेलाचा वापर केला जातो. परंतु आजही अनेक घरांमध्ये मोहरी तेलाचाच वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मोहरीतेल हे आपल्या तब्येतीसाठी अतिशय फायदेशीर समजले जाते. मोहरीतेल हे फक्त आपले खाद्यपदार्थ तयार करण्यासाठीच नाही तर आपली सुंदरता वाढवण्यासाठी या तेलाचा उपयोग केला जातो. मोहरी तेल हे एक सर्वसाधारण तेल आहे जे अन्न तयार करण्यासाठी वापरले जाते. मोहरी तेलाला कडू तेल असे ही म्हंटले जाते. या तेलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील जखम लवकर भरून येते.

आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या वेदना तसेच कानातील वेदना या समस्येसाठी हे तेल अतिशय उपयोगी मानले जाते. आयुर्वेदामध्ये या तेलाचा वापर औषध तयार करण्यासाठी केला जातो.  मोहरी तेलाच्या मॉलिश मुळे आपले शरीर अधिक मुलायम तसेच शरीरातील ज्यादा असणारी चरबी कमी होते. या तेलामध्ये मोनो अनसाचूरेटेड हे मोठ्या प्रमाणात असते. या शिवाय anti-inflammatory गुण पण आहेत. आपण या ठिकाणी  तेला पासून होणारे फायदे जाणून घेऊया.


1) इन्फेक्शन:  
मोहरी तेलामध्ये अंटीबॅक्टरियल आणि अँटी व्हायरल हे गुण आहेत. त्यामुळे याचा बाह्य आणि अंतर्गत वापर केला जातो.   हे तेल अनेक इन्फेक्शन वाचवण्यासाठी मदत करते.
2) भूक वाढवणे : 
ज्या लोकांना कमी भूक लागते त्यांनी मोहरी तेलाचे तेलाचा वापर केला पाहिजे. हे तेल आपली भूक वाढवण्याचे काम करते. एवढेच नव्हे तर पोटाचे आरोग्य  चांगले राहण्यासाठी या तेलाची मदत  होते.
3) हृदयासाठी उपयुक्त : 
अनेक संशोधकांच्या मते खाद्य पदार्थ हे मोहरी तेलापासून तयार केल्यास त्याचा हृदयाला चांगला फायदा होतो. यामध्ये एफ ए यु हा घटक असतो. जो आपल्या शरीरातील ब्लड फॅट लेव्हल तसेच रक्ताभिसरण चांगले ठेवण्यासाठी मदत करतो.
4) त्वचा 
मोहरीतेल त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरते. यामध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन ई मुळे त्वचा चांगली राहते. मोहरी तेलातून त्वचेला पोषक घटक मिळतात.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT