food  sakal
फूड

World Food Day : दररोज वाया जाते २५ हजार लोकांचे अन्न; अन्न हे पूर्ण ब्रह्मचा विसर महागाईतही अन्नाची नासाडी

नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक भूक निर्देशांकातही आपला क्रमांक तळाला गेला आहे. महागाईने आक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

अश्विनी म्हारोळकर

नागपूर - ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म ’ही आपली संस्कृती आपण विसरत चाललो तर नाही ना ? कारण एकीकडे महागाईचा भडका उडाला असतानाही अन्न नासाडीचे प्रमाणही चिंताजनक वाढले आहे. एकट्या नागपूरचे उदाहरण घेतले तरी दररोज सुमारे १५ हजार किलोवर अन्नाची नासाडी होते. या अन्नात किमान २५ हजार नागरिकांचे पोट सहज भरू शकते.

नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक भूक निर्देशांकातही आपला क्रमांक तळाला गेला आहे. महागाईने आक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे. परिणामी अनेक गरिबांना एकवेळ जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. त्यांचा विचार केल्यास ही अन्न नासाडी आपल्याला परवडणारी नसल्याचे दिसते. घराघरातील स्थिती गंभीर आहेच. पण हॉटेल्स व मंगल प्रसंगीच्या जेवणावळींनी अन्न नासाडीत उच्चांक गाठल्याचे चित्र आहे.

दररोज वाया जाते २५ हजार लोकांचे अन्न !

१) नागपूर महानगर पालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाच्या गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीनुसार तीन वर्षांत १६ हजार टन अन्न वाया गेले. एका वर्षात साडेपाच हजार टन तर महिन्याकाठी ४५० टन म्हणजेच एकट्या नागपूर शहरात दिवसाला १५ हजार किलो अन्न वाया जाते.

२) लग्न समारंभात साधारण ५०० पत्रिकांचे वाटप केल्यानंतर जे अन्न बनविले जाते, त्यामध्ये आणखी किमान १०० ते १५० माणसे सहजपणे जेवण करू शकतात.

३) हॉटेलमध्ये दिवसाला किमान १५ ते २० टक्के अन्न वाया जाते. विशेषतः लहान मुलांसाठी घेतलेले अन्न मोठ्या प्रमाणात वाया जाते.

४) पदार्थांची संख्या जास्त तेवढी नासाडी अधिक होते. स्टार्टर्सची संख्या अधिक असल्याने मेन कोर्सला हात घालण्यापूर्वीच अनेकांचे पोट ७० टक्के भरलेले असते.

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी.

-घरातील माणसांच्या आहार विचारात घेऊनच अन्न शिजवा.

-लग्न कार्यात मोजकेच पदार्थ ठेवा.

-समारंभात अन्न घेताना वाया जाणार नाही याची काळजी घ्या .

-मानसिकता बदला

भुकेल्यांचा आधार रॉबिन हुड आर्मी

रॉबिन हुड आर्मी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भुकेल्यांना अन्न पुरविले जाते. तुम्ही फोन केला की, तुमच्याकडे शिल्लक राहिलेले अन्न स्वयंसेवक तुमच्या घरून स्टीलच्या कंटेनरमध्ये घेऊन जातात. या कामात तरुणांपासून तर ज्येष्ठ नागरिकापर्यंत असे २५० स्वयंसेवक सेवाभावाने हे कार्य करीत आहेत. ज्या ठिकाणाहून अन्न गोळा केले जाते त्याच्या आसपासच्या परिसरातील भुकेलेल्यांची भूक त्यातून भागवली जाते. या संस्थेच्या मार्फतच गेल्या पाच वर्षांपासून अनेक शाळाबाह्य मुलांची मोफत शिकवणी घेतली जात आहे.

अन्न उरल्यास येथे संपर्क करा अनेकदा छोट्या मोठ्या कार्यक्रमात अन्न शिल्लक राहते. दुसऱ्या दिवशी ते कचऱ्याच्या गाडीत फेकले जाते. त्यापेक्षा तुम्ही एकच करा. आम्ही देत असलेल्या या क्रमांकावर फोन करा. ८०८७७८१९६८- यश भगत ८२३७८८७३४३- निश्चय शेंडे

घरगती कार्यक्रमात अन्न वाया जाण्याचे प्रमाण तसे कमी असते. ग्राहकाने उपस्थितांचा जो आकडा सांगितलेला असतो त्यानुसारच आम्हाला जेवण तयार करावे लागते. पोळ्या, भात हा प्रकार ऐनवेळी करता येतो. मात्र भाज्या एकाचवेळी केल्या नाहीत तर गडबड होते. त्यामुळे वाया जाणाऱ्या अन्नात भाज्यांचे प्रमाण जास्त असते. - प्रीती कठाळे-खोतताल, अष्टविनायक केटरर्स , नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT