कोल्हापूर : सकाळी लवकर उठणे तसे सोपे नाही, साधारत: जेव्हा वातावरण बदलत असतो. यावेळी सकाळी लवकर उठल्यावर घराबाहेर पडण्याआधी पोटभर नाश्ता करणे गरजेचे असते. मात्र दरवेळी हे शक्य असतेच असे नाही. खासकरून तेव्हा जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा चटक मटक खाण्याची मनस्थिती असते. यावेळी सोपे पदार्थ बनवण्यावर तुमचा भर असतो. तो सर्वांना आवडलाही पाहिजे. इतर वेळी आपण ऑम्लेट ब्रेड, अनाज असे काही पदार्थ तयार करण्याच्या तयारीत असता. कधी कधी सकाळच्या गडबडीत लोक नाश्ता करणेही विसरून जातात. आहार तज्ञांच्या मते नाश्ता न करणे ही चुकीची पद्धत आहे. अशामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि यामुळे वजन वाढू शकते. यावर आमच्याकडे उपाय आहे तुम्ही एक साधी सोपी रेसिपी तयार करू शकता. ते म्हणजे पोहे.
पोहे हा पारंपरिक नाष्टा आहे. ज्याला पूर्ण देशांमध्ये बनवला जातो. काही ठिकाणी लोक पोहेत शेव घालून खाणे पसंत करतात. महाराष्ट्रात कांदा घालून पोहे खाणे पसंत करतात. ज्याला कांदेपोहे असं म्हंटलं जातं. पोहे म्हणजे चपट्या तांदळासारखा एक चिवड्याचा प्रकार आहे. पोहे ही देशात सर्वत्र लोकप्रिय आणि व्यापक रूपात ओळखला जाणारा पदार्थ आहे. पोहे तयार करण्यासाठी काही ठिकाणी चिरलेली भाजी, कडीपत्ता, मोहरी, मसाले ही सामग्री लागते. याला तुम्ही तुमच्या पसंतीने बनवू शकता. मध्य आणि पश्चिम भारतात याची व्यापकता लोकप्रिय आहे. याचे अनेक प्रकार आहेत. जे लोकांनी आपल्या आपल्या हिशोबाने सेट केले आहेत. नागपूरचे पोहे हे याचं एक उत्तम उदाहरण आहे.
नागपुरी तर्री पोहे कसे बनवावे
कृती - सुरुवातीला नेहमीप्रमाणे पोहे बनवुन घ्या. त्यात आता काळ्या वटाण्याची किंवा चणाची करी बनवुन घ्या. यासाठी कांदा, आलं, लसुण याची पेस्ट करुन घ्या. कढईत तेल गरम करुन घ्या. त्यामध्ये मोहरी, तमालपत्र, मिरे घालून परतवून घ्या. तयार पेस्ट या मिश्रणात घाला. तिखट, जिरे पावडर, धने पावडर, मीठ घालुन पाणा टाका. आता यात भिजवलेले चणा किंवा काळे वटाणे टाका आणि ते शिजवून घ्या. त्याला काळसर कलर आला की, त्याच टोमॅटोचे दोन भाग करुन टाका आणि ते पोहे सोबत सर्व्ह करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.