National Sugar Cookie Day  esakal
फूड

National Sugar Cookie Day : सोप्या पद्धतीनं घरीच बनवा अगदी कुरकुरीत अन् टेस्टी शुगर कुकी

आपण जाणून घेऊया शुगर कुकीज बनवण्याची रेसिपी

साक्षी राऊत

National Sugar Cookie Day : तुम्ही स्विट लव्हर असाल किंवा तुम्हाला बेकिंगची आवड असेल आजचा दिवस खास तुमच्यासाठीच. कारण आज आहे नॅशनल शुगर कुकी डे. शुगर कुकी या अनेकांच्या आवडत्या असतात. जगभरात याची मोठी विक्री होताना दिसते. चला तर या खास दिवशी आपण जाणून घेऊया शुगर कुकीज बनवण्याची रेसिपी.

शुगर कुकीजची निर्मिती कशी झाली?

शुगर कुकीजची नेमकी उत्पत्ती थोडी अस्पष्ट असली तरी 18 व्या शतकात नाझरेथ, पेनसिल्व्हेनिया येथे शोध लागला, जेथे जर्मन प्रोटेस्टंट स्थायिकांनी "नाझरेथ शुगर कुकीज" म्हणून ओळखल्या जाणार्‍या कुकीची पाककृती सादर केली. या सुरुवातीच्या शुगर कुकीज सोप्या होत्या आणि त्या वेळी लोणी, साखर, अंडी, व्हॅनिला आणि मैदा यांसारख्या सहज उपलब्ध असलेल्या घटकांसह बनवल्या जात होत्या.

ही शुगर कुकी रेसिपी बनवायला सोपी आहे.

शुगर कुकीजसाठी लागणारे साहित्य

100 ग्रॅम मैदा

100 ग्रॅम पिठि साखर

50 ग्रॅम बटर

50 ग्रॅम क्रिम चिज

1 टेबलस्पुन मिक्स जॅम

चविनुसार मीठ

1 अंड (recipe)

कुकीज बनवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

स्टेप १

शुगर कुकिज बनवण्याचे साहित्य डिश मध्ये काढुन ठेवा नंतर मैदा व पिठीसाखर चाळुन मिक्स करा

स्टेप २

वाटी मध्ये अंड फोडून बिट करा त्यात बटर व क्रिम चिज टाकुन चांगले बिट करा नंतर त्यात मैदा पिठिसाखरेचे मिश्रण मीठ टाकुन बिट करा

स्टेप ३

फेटलेले मिश्रण1/2 तास फ्रिजमध्ये ठेवा (Food)

स्टेप ४

1/2 तासांनी मिश्रण काढुन ट्रे वर प्लॉस्टिक शिट ठेवुन आपल्या आवडीनुसार लहान मोठे गोळे करून ठेवा काही गोळ्यांवर मिक्स जॉम लावुन बेक करा.

स्टेप ५

ओटीजी180 वर 10 मिनिटे प्रिहिट करून त्यात ट्रे ठेवुन कुकिज12-15 मिनिटे बेक करा व नंतर थंड करा

स्टेप ६

तयार शुगर कुकीज प्लेटमध्ये स्वर्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bala Nandgaonkar: चक्क राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार! बाळा नांदगावकर यांनी का केली ही भविष्यवाणी?

Yavatmal Assembly Election : जिल्ह्यात फुटू शकतात बंडखोरीचे फटाके... दिग्रस, यवतमाळ, पुसद मतदारसंघावरून ओढाताण

FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार

Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

Jalgaon Crime News : शाळकरी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून ‘ब्लॅकमेलिंग’! दोन संशयितांना अटक; मोबाईल जप्त

SCROLL FOR NEXT