Paneer Kheer Recipe:  Sakal
फूड

Navratri Fast Recipe: नवरात्रीत सकाळी आरोग्यदायी नाश्ता करायचा असेल तर बनवा स्वादिष्ट 'पनीर खीर', नोट करा रेसिपी

Paneer Kheer Recipe: नवरात्रीत दिवसभर उत्साही राहायचे असेल तर सकाळी नाश्त्यात पनीर खीरचे सेवन करू शकता.

पुजा बोनकिले

Paneer Kheer Recipe: शारदीय नवरात्री सुरू होऊन आज 7 दिवस पुर्ण झाले आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. मान्यतेनुसार माता दुर्गेची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

नवरात्रीत सकाळी नाश्त्यात आरोग्यदायी पदार्थ खायचे असेल तर पनीर खीर बनवू शकता. पनीरमध्ये प्रथिने, फायबर, पोटॅशिअम, कॅल्शिअम यासारखे अनेक पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच पनीर खीर बनवणे खुप सोपे असून लवकर तयार होते.

पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पनीर खाल्याने व्हिटॅमिन बी १२चे प्रमाण वाढते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच कोलेस्टॉलची पातळी नियंत्रणात ठेवते. चला तर मग जाणून घेऊया पनीर खीर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

पनीर खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पनीर

काजू

बदाम

पिस्ता

दूध

वेलची पावडर

पनीर खीर बनवण्याची कृती

पनीर खीर बनवण्यासाठी सर्वात आदी ३ कप दूध एका पॅनमध्ये गरम करावे.

चमचाच्या मदतीने दूध ढवळत राहावे.

नंतर ५ ते ६ चमचे साखर टाकून चांगले मिक्स करावे.

नंतर बारिक केलेले काडू, बदाम, पिस्ता मिक्स करावे.

नंतर वेलची पावडर टाकावी.

नंतर बारिक केलेल पनीर मिक्स करा आणि चांगले शिजवा.

तुम्ही गरम किंवा थंडकरून पनीर खीरचा आस्वाद घेऊ शकता.

टिप: खीर तयार करण्यासाठी पनीर ताजे वापरावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT