Guava Candy sakal
फूड

फ्युजन किचन : पेरूची कॅंडी

आपण लहानपणी शाळेबाहेर त्या संत्र्याच्या गोळ्या खायचं ते आठवतं का? चार आण्याला चार-पाच मिळायच्या. एकाने जरी विकत घेतल्या तरी सगळ्यांना वाटून खायचं. काय मजा यायची ना.

सकाळ वृत्तसेवा

- नीलिमा नितीन

आपण लहानपणी शाळेबाहेर त्या संत्र्याच्या गोळ्या खायचं ते आठवतं का? चार आण्याला चार-पाच मिळायच्या. एकाने जरी विकत घेतल्या तरी सगळ्यांना वाटून खायचं. काय मजा यायची ना. बोअर होत असेल तर टाक एक तोंडात, किंवा आनंद झाला असेल तर मित्र-मैत्रिणींसोबत वाटून खाण्यात जी मजा यायची, त्याला मोल नाही किंवा प्रवासात हमखास सोबत असायच्या. आजकाल हे सगळं लुप्त झालं आहे.

आपण हल्ली तब्येतीबद्दल जास्त जागरूक झालो आहोत- जे योग्यच आहे. शिवाय आजकाल बाजारात मिळणाऱ्या टॉफी, चॉकलेट्स यांत केमिकल्स आणि विविध प्रकारचे प्रीझर्वेटिव्ह, कलर्स, फ्लेवर्स यांचा मारा केलेला असतो. अशावेळी या फक्त साखर आणि केमिकलने बनवलेल्या ट्रॉफीज न खाणंच योग्य.

त्याऐवजी रसदार ताजी फळं, सीझनल फळं खाणं कधीही उत्तम, नाही का? पण ही फळे आपण प्रत्येक ठिकाणी नेऊ शकत नाही; पण त्यांचा वापर करून कुठलेही सिंथेटिक रंग किंवा इसेन्स न वापरता अगदी छोट्याशा डबीत नेता येणारी टॉफी जर आपण घरीच बनवली तर, म्हणजे मुलांना शाळेत देता येईल, उपवासाला चालेल, तोंडाला छान चव आणि प्रवासातला कंटाळाही दूर करण्यासाठी पटकन तोंडात टाकता येईल. कशी वाटली कल्पना?

खरं सांगायचं तर ही आयडिया माझ्या स्वतःच्या गरजेतून निर्माण झालेली आहे. घरी मुलगा ताजी फळं खायला नकार देतो, तेव्हा अशी काही युक्ती लढवावी लागते. अर्थात याला ताज्या फळाची सर नाही; पण म्हणतात ना दुधाची तहान ताकावर भागवणं- तसाच काहीतरी प्रकार आहे. आज आपण जे पेरूचे लाडू किंवा टॉफी बनवणार आहोत, ते तुम्ही नुसतेच बनवू शकता किंवा मी इथे कृतीत सांगितल्याप्रमाणे त्याला चॉकलेटमध्ये घोळू शकता.

चॉकलेटचा वापर न केल्यास तुम्ही हे उपवासालाही खाऊ शकता. अतिशय कमी साहित्यात रसदार असे बनतात. याशिवाय तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे सॉफ्ट जेलीसारखे किंवा कडक बनवू शकता. त्यासाठी हे मिश्रण किती आटवायचं याचा अंदाज मात्र तुम्हाला असायला हवा. चला तर मग बघूया साहित्य आणि कृती.

साहित्य :

छान पिकलेला लाल रंगाचा पेरू पल्प/ गर दोन वाट्या, साखर दीड ते दोन वाटी, चिमूटभर मीठ, चॉकलेट कोटिंगसाठी पांढरे चॉकलेट वितळून, एक वाटी चिली फ्लेक्स व मीठ सजावटीसाठी.

कृती :

  • पेरू मिक्सरमध्ये फिरवून गाळून घ्यावं- जेणेकरून त्याच्या बिया येणार नाहीत.

  • पेरूचा गर व साखर मिक्स करून आटवून घ्या. त्याचा साधारणतः गोळा बनत आल्यावर चिमूटभर मीठ टाकून परत मिक्स करा. मी यात वेलची पूड घातली नाही- कारण पेरूला स्वतःचा असा स्वाद असतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घालू शकता.

  • हे मिश्रण थोडं गार झाल्यावर हाताला तूप लावून आवडीनुसार छोटे मोठे गोळे बनवून घ्या.

  • हे लाडू वितळलेल्या पांढऱ्या चॉकलेटमध्ये टूथपिकच्या साह्यानं बुडवून काढा व बटर पेपरवर ठेवून द्या. त्यावर लगेच थोडे चिली फ्लेक्स व मीठ भुरभुरा व थंड होऊ द्या.

  • एअरटाईट कंटेनरमध्ये, डब्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता. नक्की करून बघा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pench Hot Air Balloon: पर्यटकांसाठी पर्वणी! पेंचच्या व्याघ्र प्रकल्पात 'हॉट एअर बलून', 'पॅरामोटरिंग सफारी', ‘कोलितमारा फ्लाइंग' सुरु

Rishabh Pant अन् दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वाजलं; एक हट्ट अन् यष्टीरक्षकाने गमावलं संघातील स्थान, आता...

Sada Sarvankar: "बाळासाहेब असते तर..."; अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन सरवणकर नाराज; ट्विट करत व्यक्त केल्या भावना

Pune Gun Fire: पुण्यात तिघांनी केला गोळीबार; डीपी रोडवरील घटना

Gautam Gambhir cheating case : गौतम गंभीर अडचणीत ! दिल्ली कोर्टाने दिले तपासाचे आदेश, जाणून घ्या 'चिटींग' प्रकरण

SCROLL FOR NEXT