Harbhara Dhokala Sakal
फूड

फ्युजन किचन : हराभरा ढोकळा

सकाळ वृत्तसेवा

- नीलिमा नितीन

आजकाल आपण सगळे जण आरोग्याच्या बाबतीत जास्त जागरूक झालो आहोत. विविध प्रकारच्या उद््भवणाऱ्या नवनवीन आजारांमुळे ही जागरूकता वाढली आहे आणि ते योग्यही आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य व्यायाम, आहार हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याला बरेचसे आजार हे सहज टाळता येतील.

आरोग्य चांगलं राहण्यासाठी चांगला आहार अतिशय महत्त्वाचा असतो. मग तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल, प्रतिकारशक्ती वाढवायची असेल किंवा एकंदरीतच निरोगी आयुष्यासाठी आहार चांगला असणं हे मुळातच गरजेचं असतं. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, की चांगला आहार म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यात खाण्यापिण्यात येणाऱ्या गोष्टींबद्दलची माहिती.

सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांना माहीत असत काय खावं, काय खाऊ नये. तसंच काय कमी प्रमाणात खावं. तेलकट, तळलेलं, शक्य तितकं कमी खावं. साखर, मीठ जमेल तेवढं आहारातून कमी करावं. मैदा; तसंच त्यापासून बनवलेले पदार्थ टाळावेत. भरपूर पाणी प्यावं. ताज्या मोसमातली फळं खावीत. भरपूर भाज्या खाव्यात. ताजं जेवण जेवावं.

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज असतात. तसंच त्यात भरपूर प्रमाणात चोथा म्हणजे फायबर असतो. प्रोटिन असतात आणि त्यामुळे ते शरीरास अनेक उत्तम लाभ देतात. त्यामुळे कडधान्यांचा समावेश आहारात नियमित असावा. त्याचप्रमाणे हिरव्या पालेभाज्यासुद्धा आरोग्यासाठी अतिशय चांगल्या असतात.

विविध प्रकारची प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आपल्याला त्यातून मिळत असतात. ही सर्व माहिती आपल्या सर्वांना असतेच. पण हे माहीत असूनही आपण आपल्या दैनंदिन आहारात यापैकी किती गोष्टी अमलात आणतो, हे जास्त महत्त्वाचं, नाही का? मोड आलेल्या धान्यांची उसळ किंवा पालेभाज्यांचे प्रकार तब्येतीस नक्कीच चांगले असतात, तरी ते कंटाळवाणे होऊ शकतात म्हणून आपण त्यांचे विविध प्रकारचे पदार्थ बनवून खाण्याचा प्रयत्न करत असतो.

जसे डोसे, धिरडे, अप्पे वगैरे. त्यामुळे अशा विविध प्रकारच्या (रेसिपीजची ) पदार्थांची सूची आपल्याकडे असल्यास ते करण्यासही सोपे जाईल व कुटुंबातले सदस्य ते खाताना नाकही मुरडणार नाहीत. म्हणूनच आजची रेसिपी ही मोड आलेली कडधान्यं व हिरव्या पालेभाज्या वापरून बनवलेली आहे. खाण्यास अतिशय खमंग व बनवण्यास सोपी आहे.

आपण सर्व आवडीनं न्याहारीसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी खमण किंवा ढोकळा खात असतो. हा ढोकळा खमणसारखा स्पाँजी नसला, तरी चविष्ट नक्कीच आहे. शिवाय अतिशय पौष्टिकही आहे. यात मी पालक वापरला आहे; पण तुम्ही इतर पालेभाज्या वापरू शकता, तसंच संमिश्र कडधान्यांचा वापरही करू शकता. चला तर मग बघूया साहित्य आणि कृती.

साहित्य -

मोड आलेले मूग दोन वाट्या, तीन ते चार लसणाच्या कळ्या, चवीनुसार हिरवी मिरची व मीठ. दोन चमचे तेल + व थोडे तेल भांड्याला लावण्यासाठी.

एक पाकीट फ्रूट सॉल्ट, चिरलेला पालक एक ते दोन वाट्या, थोडेसे तीळ सजावटीसाठी.

कृती -

  • मोड आलेले मूग, पालक, लसूण, मिरची हे एकत्र मिक्सरमधून वाटून घ्या.

  • नंतर यात मीठ, तेल घालून व्यवस्थित फेटून घ्या.

  • दुसरीकडे आपण ढोकळा जसा वाफवतो, तसे वाफवण्यासाठीची तयारी करा.

  • एका खोलगट प्लेटला किंवा डब्याला तेल लावून तयार ठेवा. त्यावर थोडे तीळ पसरवून घाला.

  • नंतर वाटलेल्या मिश्रणामध्ये (इनो) फ्रूट सॉल्ट घालून तोही व्यवस्थित मिक्स करा व लगेच हे मिश्रण तेल लावलेल्या डब्यात व्यवस्थित लावून घ्या व ढोकळा वाफवतो त्याप्रमाणे पंधरा ते वीस मिनिटे वाफवून घ्या.

  • थोडेसे थंड झाल्यावर याच्या वड्या कापून घ्या.

मी यावरती कुठल्याही प्रकारची फोडणी घातली नाही; पण तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ती घालू शकता. सॉसबरोबर, हिरव्या चटणीबरोबर किंवा नुसताचसुद्धा खाण्यास हा ढोकळा अतिशय चविष्ट लागतो. नक्की करून बघा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''पीएम केअर फंडातला घोटाळा ७० हजार कोटींच्या घोटाळ्याला लाजवेल एवढा मोठा'' उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

कारखानदारांनी 'हे' सिद्ध केल्यास 5 तोळे सोने, 1 लाख, एक कार देऊ अन् त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू; 'स्वाभिमानी'चं चॅलेंज

Shrirampur Crime : लिफ्ट घेतली, मैत्री झाली अन् जीवही गमावला,तरुणाच्या खुनाचा श्रीरामपूर पोलिसांनी लावला तपास

Latest Maharashtra News Updates : 'योजना जाहीर करत सुटलेयत, पण अंमलबजावणी नाही' - उद्धव ठाकरे

Tata Group: टाटा समूह मोठी कंपनी विकणार? एअरटेल खरेदी करणार कंपनीतील हिस्सा; ग्राहकांना काय फायदा होणार?

SCROLL FOR NEXT