Uapvas Idli Sakal
फूड

फ्युजन किचन : उपवासाची इन्स्टंट इडली

श्रावण महिना आला, की निसर्ग हिरव्या रंगांनी नटूनथटून असतो. जिकडे बघाल तिकडे हिरवळ डोळ्यांना सुख देत असते.

सकाळ वृत्तसेवा

- नीलिमा नितीन

श्रावण महिना आला, की निसर्ग हिरव्या रंगांनी नटूनथटून असतो. जिकडे बघाल तिकडे हिरवळ डोळ्यांना सुख देत असते. ते सौंदर्य बघूनच मन कसं अगदी प्रफुल्लित होतं असतं. विविध रंगाच्या फळांना, फुलांची बहार असते.

निसर्गाचं हे लोभस रूप डोळ्यांनी टिपत मनावरची मरगळ कधी दूर होते कळतही नाही. या अशा मोहक वातावरणात भर पडते, ती या महिन्यापासून येणाऱ्या विविध सणांची. एकापाठोपाठ एक सण येत असतात आणि घर कसं उत्साहानं भरून जातं.

बरं, फक्त सण येत नाहीत तर या महिन्यांपासून एका उपवासही एका मागोमाग एक येत असतात. आणि हा उपवासाचा सीझन फक्त श्रावण महिन्यापूर्वी मर्यादित न राहता अगदी दिवाळीपर्यंत जोमात असतो. म्हणजेच कसं श्रावणी सोमवार, नवरात्रातील मंगळवार आणि इतरही बरेच काही उपवास. हे उपवास प्रकरण आपल्या घरातील जेष्ठ जरा जास्तच मनावर घेतात.

खरं तर त्यांचे औषध उपचार, वाढतं वय, वाढणारं पित्त आणि वयोमानापर्यंत होणारी नाजूक तब्येत बघता त्यांनी हे उपवास किती करावेत आणि कसे करावेत हा मोठा प्रश्न आहे; पण माझ्या घरच्यांच्या अनुभवानं मी हे सांगू शकते, की ही मंडळी उपवास करणं काही सोडणार नाहीत. मग अशा वेळी त्यांना रोखण्याच्या निरर्थ प्रयत्नांपेक्षा त्यांना पोटभरीचं सात्त्विक अन्न मिळावं हे बघणं जास्त योग्य नाही का? मग त्यात ताजी फळं आली, शेंगदाण्याचा लाडू आला.

यासोबतच जर वरीच्या तांदळाची म्हणजेच भगरीची हलकीफुलकी इडली दिली तर? घरातील ज्येष्ठ आणि उपवास करणारेच नव्हे, तर अगदी बच्चे कंपनीही आवडीनं खातील. करायला अतिशय सोपी, अगदी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून ही इडली बनते.

वाफवलेली असल्याकारणाने आणि अतिशय कमी तेला-तुपाचा वापर असल्यानं ही इडली पचायला अगदी हलकी आणि सोपी आहे. बरं, तुम्हाला हे माहीत आहे का आपला हा वरीचा तांदूळ म्हणजेच भगर हा अतिशय गुणकारी आहे बरं का. भगरीमध्ये प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं. भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात.

‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ असलेल्या अन्नामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. भगर पूर्णपणे ग्लुटेन फ्री आहे आणि भगरीत आयर्न जास्त प्रमाणात आढळते. या कारणामुळंच वजन कमी करायचं असेल, तर भगर हा एक चांगला पर्याय आहे.

सांगायचा मुद्दा हा, की ही इडली फक्त उपवासासाठी न खाता तुम्ही एरवीही खाऊ शकता. या इडलीसोबत लागणारी चटणीही अतिशय सोपी आहे आणि उपवासाला चालणारी आहे. इडल्या वाफेपर्यंत तुम्ही आरामात ही चटणी बनवू शकता. चला तर मग, बघू या साहित्य आणि कृती.

इडलीसाठीचं साहित्य : वरीचे तांदूळ (भगर) एक वाटी, साबुदाणा अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, दही एक वाटी, सोडा पाव ते अर्धा चमचा. यात आरामात आठ ते दहा इडल्या बनतात.

चटणीचं साहित्य : ओला नारळ अर्धी वाटी, चवीनुसार हिरवी मिरची व मीठ, अर्धा चमचा जिरे, एक छोटा आल्याचा तुकडा, चिमूटभर साखर.

कृती

  • प्रथम मिक्सरमधून साबुदाणा रवाळ वाटून घ्या. नंतर भगरही वाटून घ्या.

  • एका बाऊलमध्ये वाटलेला साबुदाणा, भगर, एक वाटी दही, मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. यात अंदाजाने अर्धा ते पाऊण कप पाणी घालून इडली पिठासारखे सरबरीत पीठ भिजवा. यातच पाव ते अर्धा चमचा सोडा घालून मिक्स करून पंधरा-वीस मिनिटांसाठी झाकून ठेवा.

  • नेहमी करतो त्याप्रमाणे इडलीच्या प्लेटला तूप लावून वरील पिठाचे पिठाच्या इडल्या पंधरा ते वीस मिनिटांसाठी वाफवून घ्या.

  • चटणीसाठी एका मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचे तुकडे, अर्धा चमचा जिरे, एक छोटा आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची घालून ही चटणी वाटून घ्या. हवं असल्यास चिमूटभर साखर व वरून जिऱ्याची फोडणी देऊ शकता. तर, नक्की करून बघा ही उपवासाची इन्स्टंट इडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT