mango coconut barfi sakal
फूड

फ्युजन किचन : आंबा, नारळ बर्फी

यश चोप्रांच्या फिल्म्सनी उत्तर भारतीय लोकांच्या करवा चौथला काय ग्लॅमर दिलं बघा! काय तो शृंगार, मेहंदी, गाणं आणि ते चाळणीतून चंद्र बघणं आणि त्यानंतर त्या बाईला मिळणारी खूप सारी गिफ्ट्स.

सकाळ वृत्तसेवा

- नीलिमा नितीन, फूड ब्लॉगर

यश चोप्रांच्या फिल्म्सनी उत्तर भारतीय लोकांच्या करवा चौथला काय ग्लॅमर दिलं बघा! काय तो शृंगार, मेहंदी, गाणं आणि ते चाळणीतून चंद्र बघणं आणि त्यानंतर त्या बाईला मिळणारी खूप सारी गिफ्ट्स. काय तो उपवासाचा थाटमाट! वाह!

असो, हे उपवासाचं प्रकरण काही मला फारसं जमत नाही. त्यातही माझं क्षेत्र असं, की मोबाईल हातात घेतला रे घेतला, की एकापेक्षा एक पदार्थांची रेलचेल असते. म्हणजे अगदी जेवण झाल्यावरही भूक चाळवली जाईल, असे एकापेक्षा एक पदार्थ दिसत असतात.

मग उपवासाच्या दिवशी तर कहरच. पाणीपुरी काय, गुजराती, राजस्थानी, साउथ इंडियन वगैरे वगैरे भारतीयच नव्हे, तर परदेशी पदार्थांचाही मार असतो. केक, चॉकलेट, पिझ्झा आणि बरंच काही म्हणजे नुसता मानसिक छळ असतो हो.

बरं, ज्याच्यासाठी आपण उपवास करायचा त्याचं मात्र मस्त ताव मारणं चालू असतं आपल्या डोळ्यांदेखत. त्या नवरोबाला आपण त्याच्यासाठी उपाशी बसलो आहोत हे लक्षातही नसतं. मग मात्र माझ्या रागाचा पारा हा सध्याच्या गर्मीच्या पाऱ्याशी स्पर्धा करतो आणि दरवर्षी वटपौर्णिमेअखेरीस मी अगदी निक्षून सांगते, ‘‘या वर्षी केला हा उपवास, पुढच्या वर्षीपासून नाही करणार. म्हणजे ज्या ज्या राज्यांत हा उपवास नसतो तिथं कुठं काय बिघडतं? शिवाय माझ्या वडिलांनी लहानपणापासून सांगितलं आहे की प्रत्येक सणाचा अर्थ समजून घे. उगाच सगळे करत आहेत म्हणून करू नको.’’

जसजशी वटपोर्णिमा जवळ येऊ लागते, तसतसं माझं वैचारिक द्वंद्व सुरू होतं. म्हणजे उपवास करू? का नको? मग ज्या नवरोबासाठी हा उपवास करायचा, त्याच्या वर्षभराच्या वागणुकीचं अवलोकन सुरू होतं. (मज्जा आहे की नाही सगळी?) मग झालेली भांडणं, त्यानं काढलेली समजूत, कसा तो माझ्या छोट्या छोट्या सवयींची दखल घेतो. सकाळची अतिप्रिय असलेली झोप मला शनिवारी, रविवारी तरी मिळावी यासाठी आवाज न होण्याची खबरदारी घेतो आणि शनिवार, रविवारचा तो आयता मिळणारा चहा. वाह! हळूहळू निर्णय निश्चित होतो आणि दर वर्षीं मी उपवास करते.

माझ्या मते, तुम्ही उपवास करा किंवा करू नका; पण प्रेम नक्की व्यक्त करा. आणि हे व्यक्त करताना काहीतरी गोड हवंच नाही का? आजची रेसिपी ही खास त्यासाठीच. उपवासाला चालणारी व इतर महिलांना द्यायला सोपी जाणारी व घरच्यांनाही आवडेल अशी पारंपरिक ‘आंबा नारळ बर्फी.’

साहित्य -

एक वाटी खोवलेला नारळ, पाव वाटी ते अर्धा वाटी साखर तुम्हाला गोड आवडेल त्याप्रमाणे, पाव वाटी क्रीम किंवा साय, पाव वाटीपेक्षा थोडासा जास्त आंब्याचा घट्ट रस, एक छोटा चमचा वेलची पूड, बेदाणे, पिस्ते सजावटीसाठी.

कृती -

  • खोवलेला नारळ, साखर, आंब्याचा रस व (क्रीम) साय एकत्र करून त्याचा गोळा होईपर्यंत जाड बुडाच्या कढईमध्ये परतून घ्या.

  • यात आता वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  • हा गोळा तूप लावलेल्या थाळीत काढून वाटीने थापून घ्या. त्यावर पिस्ते व बेदाणे लावून सजवा व आवडतील त्या आकारात त्याच्या वड्या पाडून घ्या. तुम्ही याचे लाडू पण बनवू शकता. नक्की करून बघा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT