Noodles Cover Frankie Sakal
फूड

Noodals Cover Frankie: सकाळी नाश्त्यात ४ लोकांसाठी झटपट बनवा 'नूडल्स कव्हर फ्रॅंकी', जाणून घ्या रेसिपी

पुजा बोनकिले

साप्ताहिक सकाळ

Noodles Cover Frankie Recipe: अनेक लोकांना नूडल्स खायला खुप आवडतात. तुम्ही नूडल्सचा वेगळ्या पद्धती देखील आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला सकाळी नाश्त्यात ४ लोकांसाठी नूडल्स कव्हर फ्रँकी बनवायचे असेल तर पुढील सोप्या पद्धतीचा वापर करू शकता. नूडल्स कव्हर फ्रँकी बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. नूडल्स कव्हर फ्रँकी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे हे जाणून घेऊया.

नूडल्स कव्हर फ्रॅंकी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक वाटी मॅगी नूडल्स चुरा

२ वाट्या सर्व प्रकारच्या भाज्या बारीक चिरून

चवीनुसार सैंधव

१ चमचा मिरची पावडर

२ चमचे धणे जिरे पूड

हळद पावडर

चिमूटभर गूळ

तेल

मक्याचे दाणे

गहू पीठ

मोहरी जिरे

कोथिंबीर बारीक चिरून

तूप

नूडल्स कव्हर फ्रॅंकी बनवण्याची कृती

नूडल्स कव्हर फ्रॅंकी बनवण्यासाठी सर्वात आधी नूडल्स चुरा व मका दाणे भिजत घालावे. थोड्या वेळानंतर कमीतकमी पाण्यात शिजवावे. शिजवताना मसाला, सैंधव घालावे. कोरडे करावे. गरम तेलात मोहरी जिरे घालून फोडणी करावी. भाज्या घालाव्या. हळद, मिरची पूड, धणे जिरे पूड घालून व्यवस्थित ढवळावे. बेताचे पाणी घालून शिजवावे. सैंधव व कोथिंबीर घालून वाफ काढावी. सहा इंच व्यासाची चपाती करावी. तिच्यावर मध्यभागी शिजलेली भाजी सरळ रेषेत पसरून चपाती दुमडून वळकटी म्हणजे फ्रॅंकी करावी. फ्रॅंकी तव्यावर तूप घालून फिरवून घ्यावी. वर नूडल्स व मका दाण्याची ओळ काढावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रवादीचं टेन्शन वाढवणारी बातमी; माढ्यातून परिचारक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? राजकीय घडामोडींना वेग

Vidhan Sabha Election: उत्तर महाराष्ट्रात दीड कोटी मतदारांची नोंद! हजारो अर्ज प्रलंबित; विधानसभा निवडणुकीत मतदारांचा टक्का वाढणार

Hyundai India IPO: LICचा विक्रम मोडणार! Hyundai आणणार देशातील सर्वात मोठा IPO; सेबीने दिली मंजुरी

Mahindra: टाटांच टेन्शन वाढलं! महिंद्रा लवकरच करणार स्कोडा सोबत मोठा करार; गुंतवणूकदार मालामाल होणार?

मॅनेजरने सिक लिव्ह दिली नाही, नोकरी जाण्याच्या भीतीने कामावर आली अन् सगळंच संपलं

SCROLL FOR NEXT