Veg Cutlet Sakal
फूड

हेल्दी किचन : व्हेज कटलेट

आपण आज मुलांना आवडणाऱ्या रेसिपीची माहिती घेणार आहोत. व्हेज कटलेटची सोपी रेसिपी असून ते मुलांना नक्कीच आवडतील.

सकाळ वृत्तसेवा

आपण आज मुलांना आवडणाऱ्या रेसिपीची माहिती घेणार आहोत. व्हेज कटलेटची सोपी रेसिपी असून ते मुलांना नक्कीच आवडतील.

- नूपुर पाटील

आपण आज मुलांना आवडणाऱ्या रेसिपीची माहिती घेणार आहोत. व्हेज कटलेटची सोपी रेसिपी असून ते मुलांना नक्कीच आवडतील.

साहित्य -

  • २ वाट्या उकडून मॅश केलेले बटाटे.

  • १ वाटी उकडलेल्या भाज्या (गाजर, मटार, बीन्स, कॉर्न)

  • १/२ वाटी ब्रेडचा चुरा आणि पुरेसा ब्रेड स्लाइस

  • १/४ वाटी बारीक चिरलेला कांदा

  • १/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

  • २ चमचा आले-लसूण पेस्ट

  • १ चमचा लाल तिखट

  • १ चमचा गरम मसाला

  • चवीनुसार मीठ

  • २ चमचे कॉर्न फ्लोअर

  • तळण्यासाठी तेल

कृती -

  • एका बाउलमध्ये मॅश केलेले बटाटे, मिक्स केलेल्या उकडलेल्या भाज्या, ब्रेड, कांदे, कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ एकत्र करा. हे मिश्रण एकजीव करून घ्या

  • मिश्रणाचे छोटे गोळे करून कटलेटचा आकार द्या.

  • एका लहान भांड्यात कॉर्न फ्लोअरमध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट तयार करा. प्रत्येक कटलेट या पेस्टमध्ये बुडवून त्याला ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळून घ्या.

  • पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर कटलेट काळजीपूर्वक पॅनमध्ये सोडून सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.

  • तळल्यानंतर जास्तीचे तेल काढून टाकण्यासाठी कटलेट पेपर टॉवेलवर ठेवा.

  • टोमॅटो केचप किंवा चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

तुमच्या मुलांना हे कुरकुरीत आणि स्वादिष्ट व्हेज कटलेट आवडतील.

या निमित्ताने विविध भाज्या मुलांना खायला घालता येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List : बंडात साथ देणाऱ्या 'या' तिघांना शिंदेंच्या पहिल्या यादीत स्थान नाही! कोण कुठून लढणार वाचा एका क्लिकवर

Eknath Shinde : शिंदे, वायकर, सामंत बंधू ते पाटील,जाधव; शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर, वाचा यादी एका क्लिकवर!

Gold : भाव वाढूनही सोन्याला ‘अच्छे दिन’; दोन वर्षांत २८ हजारांची भर

ग्रामीण पोलिसांचा मोठा निर्णय! महामार्गांवर आता दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती; कारवाईसाठी महामार्गांवर आता पथके; ब्लॅकस्पॉट, हॉटेल, ढाब्यांबाहेरही राहणार पोलिस

Ahmedabad News : गुजरातेत बनावट न्यायालयाचा पर्दाफाश; न्यायालयापासून न्यायाधीशापर्यंत सर्व काही बनावट

SCROLL FOR NEXT