Panjabi Dishes esakal
फूड

Panjabi Dishes : परिणीती-राघवच्या लग्नात असणार या 5 फेमस पंजाबी डिशेस, या पद्धतीने घरीच बनवा

या फेमस पंजाबी डिशेस तुम्ही घरीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.

साक्षी राऊत

Panjabi Dishes : परिणीती आणि राघव चढ्ढा आज उदयपूरच्या 'द लीला पॅलेस'मध्ये लग्न करणार आहेत. लग्नसमारंभातील कार्यक्रमांना कालपासूनच सुरुवात झालेली आहे. तेव्हा त्यांच्या लग्नाशी संबंधित अपडेट्स पुढे येताहेत. रिपोर्ट्सनुसार जोडप्याच्या लग्नाचा मेन्यू पंजाबी डिशेसने सजलेला असेल. या फेमस पंजाबी डिशेस तुम्ही घरीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.

परिणीतीच्या लग्नातील ५ फेमस पंजाबी डिशेस

१) छोले भटूरे - पंजाबच्या फेमस डिशेसबाबत बोलायचं झाल्यास सगळ्यात आधी डोक्यात नाव येतं ते छोले भटूरे या डिशचं. ही डिश उत्तर भारतातल्या अनेक उपहारगृहांत तुम्हाला बघायला मिळेल. भटूरे अगदी स्पंजी आणि आकाराने मोठे असतात. ज्यांना मसालेदार छोल्यांसह सर्व्ह केल्या जातं.

२) पराठा - पंजाबी खाण्यात स्टफ पराठे फार फेमस आहेत. या पराठ्यांना सकाळच्या नाश्त्यात सर्व्ह करण्यात येतं. मात्र तुम्ही ही डिश लंच किंवा डिनरमध्येही खाऊ शकता. हा पराठा वेगवेगळ्या स्टफिंगसोबत तयार केला जातो. जसे की, बटाटा, पनीर, गोबी, कांदा.

३) दाल मखनी - उत्तर भारतातील सगळ्यात फेमस डिशेसपैकी एक म्हणजे दाल मखनी. पंजाबी थाळीतील दाल मखनी ही पंजाबची शानच जणू. येथील उपहारगृहांत सगळ्यात आधी दाल मखनीचीच ऑर्डर दिली जाते. राजमा आणि मूगाची काळी दाळ मिक्स करून ही डिश बनवली जाते.

४) सरसो का साग आणि मक्के दी रोटी - ही पंजाबी डिश थंडीच्या काळात खूप आवडीने खाल्ली जाते. साग बनवण्यास थोडा वेळ लागतो. मात्र याची चवसुद्धा तिककीच टेस्टी असते. यासह मक्क्याची चपातीसुद्धा तेवढीच चवदार लागते. (Entertainment)

५) मलाई लस्सी - पंजाबी लोकांना लस्सी खूप आवडते. (food) याच कारणाने ही पंजाबी मेन्यूमध्ये अॅड करण्यात आली आहे. पंजाबच्या प्रत्येक घरी आणि उपहारगृहांमध्ये लस्सी बनवली जाते. मूळस्वरूपात पंजाबमध्ये बनवली जाणारी लस्सी गोड आणि मलाईदार असते. ज्यावर मोठ्या प्रमाणात मलाई घातलेली असते. हल्ली ही लस्सी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये बनवली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: अगं बाळे, घाबरून कसं चालेल? लेकीच्या काळजीने अजितदादा कसे गलबलले; सुनेत्रा पवारांनी सांगितला अनुभव

Latest Maharashtra News Updates : शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर राज ठाकरे यांच्या भेटीला

Ola Electric Stock Crash: ओला इलेक्ट्रिकला मोठा झटका! शेअर उच्चांकावरून निम्म्यावर घसरला, काय कारण आहे?

संकटासमोर सलमान पाय रोवून... सीमा सजदेहने केलं दीराचं कौतुक, म्हणाली- मलायकाच्या वडिलांच्या निधनावेळी तो

Congress Candidates: विधानसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, विद्यमान आमदाराचे कापले तिकीट; जाणून घ्या कुणाला मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT