Idli  sakal
फूड

Poha Idli Recipe: पोह्यांपासून बनवा चविष्ट इडली, जाणून घ्या सोपी रेसिपी

पोहे इडली बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.

Aishwarya Musale

तुम्ही नाश्त्यात अनेकवेळा पोहे खाल्ले असतील, पण तुम्ही कधी पोह्यांपासून बनवलेली इडली खाल्ली आहे का? होय, पोह्यांपासून बनवलेली इडली पचनाच्या दृष्टीने हलकी असते आणि चविष्टही असते. सहसा लोक पारंपारिक साउथ इंडियन स्टाइलची इडली घरी बनवतात.

परंतु जर तुम्हाला नवीन रेसिपी ट्राय करायची असेल तर यावेळी तुम्ही पोहा इडली बनवून पाहू शकता. नाश्त्यात चविष्ट पदार्थ खावेसे वाटतात जे सहज पचतात. याची चव मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही आवडेल. पोहे इडली फराळ म्हणूनही खाता येते. हे बनवायलाही खूप सोपे आहे. पोहे इडली बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.

पोहे इडली बनवण्यासाठी साहित्य

  • पोहे - १ कप

  • तांदळाचं पीठ - 1/2 कप

  • दही - 1 कप

  • फ्रुट सॉल्ट - 3/4 टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

पोह्याची इडली कशी बनवायची

चविष्ट पोहे इडली बनवण्यासाठी प्रथम जाड पोहे घ्या आणि मिक्सरच्या भांड्यात ठेवा आणि बारीक वाटून घ्या. आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये बारीक वाटलेले पोहे टाका आणि त्यात 1 कप दही घालून चांगले मिक्स करा.

या प्रक्रियेनंतर, मिश्रणात 1.25 कप तांदळाचं पीठ घाला आणि चांगले मिसळा. तांदळाचं पीठ उपलब्ध नसल्यास उपमा रवा वापरता येतो. आता या मिश्रणात 1 कप पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. यानंतर तयार मिश्रण झाकून अर्धा तास बाजूला ठेवा.

यानंतर मिश्रणात अर्धा कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा. शेवटी, मिश्रणात फ्रुट सॉल्ट मिसळा. आता इडलीचे भांडे घ्या. यानंतर, त्यात इडलीचे पीठ घाला आणि 15 मिनिटे इडली शिजवा. नाश्त्यासाठी चवदार इडली तयार आहे. चटणी, सांबार बरोबर सर्व्ह करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT