Poha Potato Cutlet esakal
फूड

Poha Potato Cutlet : नाश्त्यामध्ये झटपट बनवा स्वादिष्ट पोहे-बटाटा कटलेट, एकदम सोपी आहे रेसिपी

Monika Lonkar –Kumbhar

Poha Potato Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये सर्वांनाच पोहे खायला आवडतात. कधीकधी वेगळ काहीतरी म्हणून या पोह्यापासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देखील बनवले जातात. सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे, या दिवसांमध्ये काहीतरी कुरकुरीत आणि खमंग खाण्याची सगळ्यांची इच्छा होते. त्यासाठी, तुम्ही पोहे-बटाटा कटलेट हा पदार्थ नक्कीच बनवू शकता. नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. चवीला हा पदार्थ भन्नाट लागतो.

पोहे-बटाटा कटलेट् बनवण्यासाठी तुम्हाला फार साहित्याची गरज पडणार नाही. शिवाय, अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्ही हे कटलेट नक्कीच बनवू शकता. हे पोहे-बटाटा कटलेट सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सायंकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. हे बटाटा-पोहे कटलेट कसे बनवायचे? चला तर मग जाणून घेऊयात बटाटा-पोहे कटलेटची ही सोपी रेसिपी.

बटाटा-पोहे कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ कप पोहे

  • १ बटाटा

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • १ टोमॅटो बारीक चिरलेला

  • चाट मसाला - अर्धा चमचा

  • लाल तिखट – २ चमचे

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • तांदळाचे पीठ – २ चमचे

  • आवश्यकतेनुसार तेल

  • चवीनुसार मीठ

बटाटा-पोहे कटलेट बनवण्याची सोपी पद्धत :

  • बटाटा-पोहे कटलेट बनवण्यासाठी सर्वात आधी १ कप पोहे धुवून घ्या. हे पोहे एका भांड्यात किंवा चाळणीत भिजत घाला.

  • पोहे भिजल्यानंतर ते एका बाऊलमध्य ठेवा.

  • आता उकडलेले बटाटे सोलून घ्या आणि ते स्मॅश करून घ्या.

  • आता पोह्यामध्ये, बटाटा,टोमॅटो, कांदा, चाट मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला. हे छान प्रकारे मिसळून घ्या, आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला

  • या सर्व मिश्रणापासून तुम्हाला हव्या त्या आकाराचे कटलेट बनवून घ्या.

  • आता दुसऱ्या बाजूला गॅसवर कढई गरम करायला ठेवा.

  • त्यानंतर, बटाटा-पोहे कटलेट तांदळाच्या पीठात घोळून ते गरम तेलात तळून घ्या.

  • कटलेटचा रंग सोनेरी होईपर्यंत ते छान प्रकारे तळून घ्या.

  • आता तुमचे गरमागरम आणि क्रिस्पी पोहे-बटाटा कटलेट तयार आहेत. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खायला घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT