Potato Paratha : सकाळचा नाश्ता हेल्दी असेल तर दिवसभर एनर्जी पुरते. तुम्हाला सकाळच्या वेळेत झटपट नाश्ता बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही बटाटे न उकडतासुद्धा वेळीच बटाटा आणि कांदा घालून पराठा बनवू शकता. शेफ पंकज त्रिपाठीने तिच्या इन्स्टाग्रामवर १० मिनिटांत बनणाऱ्या पराठ्याची रेसिपी शेअर केली आहे. चला तर जाणून घेऊया सोपी ट्रिक.
बटाटा कांद्याचे पराठे बनवण्यासाठी सगळ्यात आधी ३ बटाटे घ्या. त्याला स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे काप करून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये बटाटे, ३ हिरव्या मिर्च्या, १ छोटा तुकडा आल्याचा, १ कांदा बारीक करून त्याची पेस्ट तयार करून घ्या.
त्यानंतर ही पेस्ट २ कप पिठात मिक्स करा. त्यात एक छोटा चमचा कसूरी मेथी, १ छोटा चमचा मिर्ची पावडर, १ छोटा चमचा मीठ आणि १ छोटा चमचा तेल घालून कणीक मळून घ्या. त्यानंतर कणकीचा गोळा करून हलक्या हाताने त्यावर तूप लावा. त्यानंतर गोळ्याचा पराठा लाटून घ्या. त्यानंतर त्यावर बारीक कापलेला कांदा हिरवी मिर्ची, कोथिंबीर आणि त्यावर परत थोडे पीठ घालून परत एकदा हळूवारपणे लाटून घ्या. आता पराठा गॅसवर मिडियम फ्लेमवर बटर लावून शेकून घ्या. तुमचा टेस्टी बटाटा कांद्याचा पराठा अगदी तयार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.