Potato Vada Appe: Sakal
फूड

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात कमी वेळेत बनवा बटाटे वड्याचे आप्पे, जाणून घ्या रेसिपी

Potato Vada Appe: तुम्हाला सकाळी कमी वेळेत नाश्ता तयार करायचा असेल तर बटाटे वड्याचे आप्पे बनवू शकता.

पुजा बोनकिले

साप्ताहिक सकाळ- रेखा नाबर

Potato Vada Appe: सकाळी नाश्ता केल्याने दिवसभर थकवा जाणवत नाही. तुम्हाला कमी वेळेत तयार होणारा पदार्थ हवा असेल तर बटाटे वड्याचे आप्पे बनवू शकता. हे आप्पे बनवणे खुप असून चवदार देखील आहे. बटाटे वड्याचे आप्पे बनवण्याची पद्धत आणि लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे आहे. तुम्ही लहान मुलांच्या डब्यात देखील हा पदार्थ देऊ शकता.

बटाटे वड्याचे आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे

४ टेबलस्पून पेस्ट (आले, लसूण, मिरची, कोथिंबीर)

चवीनुसार सैंधव

तेल

मोहरी

हिंग

बेसन

किंचित गूळ

बटाटे वड्याचे आप्पे बनवण्याची कृती

बटाटे वड्याचे आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून कुसकरावे.

त्यात पेस्ट व मीठ घालून मळून घ्यावे.

१ टेबलस्पून गरम तेलात हिंग, मोहरीची फोडणी करून पिठावर ओतून छान मळून ठेवावे.

बेसनामध्ये बेताचे पाणी, सैंधव व किंचित गूळ घालून एकजीव करावे.

आप्पेपात्राच्या प्रत्येक खोलगट भागात अर्धा चमचा तेल घालून तापत ठेवावे.

बटाट्याच्या मिश्रणाचे खोलगट भागापेक्षा लहान आकाराचे गोळे करावेत.

बेसनाच्या मिश्रणात प्रत्येक गोळा बुडवून गरम तेलात ठेवावा.

एका बाजूने खरपूस भाजल्यावर उलटावा.

दुसऱ्या बाजूने चांगला भाजल्यावर बाहेर काढावा.

अशा पद्धतीने सर्व आप्पे करून घ्यावेत. हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

SCROLL FOR NEXT