Pratiksha Jadhav Sakal
फूड

ग्लॅम-फूड : ‘चीज केक खूप आवडतो’

मी खूप प्रवास करत असते. प्रत्येक राज्यातले पदार्थ मी ट्राय केलेत. इंदूरची कचोरी, दिल्लीतली पाणीपुरी किंवा चाट मला आवडते.

सकाळ वृत्तसेवा

- प्रतीक्षा जाधव

मी फूडी आहे. मला वेगवेगळे पदार्थ खायला आणि बनवायला आवडतात. माझा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे केळ्याचा म्हणजे प्रसादाचा शिरा. त्यात गाईचे दूध आणि ड्राय फ्रूट्स असतात. ते माझ्या आवडीचे आहे. माझी आई सुगरण असल्यामुळे तिच्याच हातचा शिरा मला खूप आवडतो.

मी खूप प्रवास करत असते. प्रत्येक राज्यातले पदार्थ मी ट्राय केलेत. इंदूरची कचोरी, दिल्लीतली पाणीपुरी किंवा चाट मला आवडते. दिल्लीतली ‘मक्के दी रोटी’ आणि ‘सरसों का साग’ खूप मस्त. पंजाबमधली लस्सी, बगळूरचा मैसूरपाक हेही आवडतात. मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. एरवी शूटिंग असताना स्वयंपाक करायला वेळ नसतो; पण लॉकडाऊनमध्ये इच्छा पूर्ण झाली. मी रोज वेगवेगळे पदार्थ बनवायचे. केक बनवला, कचोरी, समोसा, मोमोज असे पदार्थ केले. मला बनवायला सगळ्यांत जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. ती मला चांगली जमते. ती मी आईकडून प्रॉपर शिकले. माझी आई डिंकाचे लाडू खूप स्वादिष्ट बनवते.

आजपर्यंत मी डिंकाचे लाडू बाहेरही खाल्ले आहेत; पण आईची रेसिपी जरा वेगळी आहे. खरं तर आमचा तो बिझनेसही आहे. माझे सर्व मित्र, नातेवाईक, सहकलाकारसुद्धा माझ्या आईकडून लाडू बनवून घेतात. मी खूप लहानपणी स्वयंपाक करायला शिकले. मी पहिल्यांदा शिकले होते वरण-भात. मी दहावीत असताना आई खूप आजारी होती. स्वयंपाक करायला कोणी नव्हतं. मग बाबांनी मला वरण बनवायचं शिकवलं. ते बिघडलं, सर्व कच्चं कच्चं राहिलं. मग बाबांनी मला सांगितलं, की वरण करताना इतर घटक, टोमॅटो आधी चांगले शिजू द्यायचे असतात. मग त्यात वरण टाकायचं.

मला चीज केक खूप आवडतो. मी युरोपला गेले, की चीज केक आवर्जून खाते. तिथले चीज केक मला खूप आवडतात. तिथल्यासारखा चीज केक मी कुठंच खाल्लेला नाही.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT