फूड

पुण्याच्या केक बेकरचे एक नव्हे दोन World Record, वाचा आता काय केलं

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेती केक आर्टिस्ट प्राची धबल देब हिने यांचे सगळीकडे कौतूक होत आहे. या केक आर्टिस्टने तयार केलेल्या '100-किलो व्हेगन खाण्यायोग्य रॉयल आयसिंग स्ट्रक्चर'चा लंडनच्या 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये समावेश करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, डेब यांनी आणखी एक विजेतेपद जिंकले आहे. दुसरा विक्रम त्यांनी जास्तीत जास्त संख्येचे 'शाकाहारी रॉयल आयसिंग स्ट्रक्चर्स'ची निर्मिती केली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करून त्यांनी माहिती शेअर केली. त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे की, "फक्त एक नव्हे तर दोन विश्वविक्रमी खिताब जिंकल्याबद्दल मी भारावून गेली आहे.'' त्यांच्या कॅप्शनमध्ये त्यांनी "सर्वात मोठ्या रॉयल आयसिंग स्ट्रक्चर" च्या परिमाणांची रूपरेषा देखील सांगितली. (Pune Cake Artist Clinched Two World Record Titles For Biggest Icing Structure)

डेब यांनी सांगितले की, त्यांनी तयार केलेले ;'सर्वात मोठे रॉयल आयसिंग स्ट्रक्चर' हे 6 फूट, 4 इंच लांबी, 4 फूट, 6 इंच उंच आणि 3 फूट, 5 इंच रुंद होते.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये असे म्हटले आहे की, डेब या "जास्तीत जास्त (अंडी नसलेला) शाकाहारी रॉयल आयसिंग स्ट्रक्चर्स हाताने काळजीपूर्वक बनवण्यासाठी ओळखल्या जातात." तिला "रॉयल आयसिंगची राणी' असेही म्हटले जाऊ शकते आणि तिच्या डिझाईन्सवरुनही हेच सिद्ध होते. " डेब रॉयल-आयसिंग आर्टमध्ये माहिर आहे. हे काम एक आव्हानात्मक आणि नाजूक आहे.

जेव्हा फुड संबधित रेकॉर्डचा विचार केला जातो तेव्हा, अनेक लोकांनी अकल्पनीय गोष्ट साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. इस्रायलमधील एका शेतकऱ्याने 300-ग्रॅम स्ट्रॉबेरी पिकवून आपली शेती करण्याची आवड नव्या पातळीव नेली आहे. इस्रायलमधील कदिमा-झोरान येथील एरियल चाही यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी, 289 ग्रॅम (स्टेमसह 299 ग्रॅम) वजनाची असून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सद्वारे जगातील सर्वात मोठी स्टॉबेरी म्हणून ओळखली जात आहे. ती स्टॉबेरी 18 सेमी लांब, 4 सेमी जाड आणि 34-सेमी परिघाची होते. पाहा अविश्वसनीय स्ट्रॉबेरीच्या फोटो

अनेक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड फुडसंबधित असतात आणि त्यापैकी काही असामान्य आहेत. विस्कॉन्सिन, युनायटेड स्टेट्समधील एका माणसाने 50 वर्षांच्या कालावधीत 32,340 बिग मॅक(बर्गर) खाऊन म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केले गेले. डॉन गोस्के याने एका व्हिडिओमध्ये म्हटले होते की, "जेव्हा मला एखादी गोष्ट आवडते, तेव्हा मी नेहमी त्याच्याशी चिकटून राहतो." त्यांनी बिग मॅकला "जगातील सर्वात मोठे सँडविच" म्हटले आणि ते त्यांचे प्राथमिक आहार असल्याचे सांगितले. दररोज दोन बिग मॅक खाण्याचा दावा त्यांनी केला आहे. या .

फळे आणि भाजीपाला वाढवणे किंवा खाणे या विक्रमांव्यतिरिक्त, रेस्टॉरंट्सने देखील जलद सेवेसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. 31 ऑगस्ट 1996 मध्ये, मेक्सिकोच्या ग्वाडालजारा येथील रेस्टॉरंटमधील वेटर्सनी फक्त 13.5 सेकंदात संपूर्ण मेनू सर्व्ह केला (होय, तुम्ही ते बरोबर वाचले), या रेस्टॉरंटला जागतिक विक्रमी शीर्षक मिळाले. तरीही, जवळजवळ 26 वर्षांनंतर, कर्णे गॅरिबाल्डी, फुड जॉइंट, एका मिनिटापेक्षा कमी वेळात अन्न पुरविते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT