Ramadan Food  esakal
फूड

Ramadan Food : रमजानच्या महिन्यात सेहरीला बनवा दिवसभर फ्रेश ठेवतील अशा खास रेसिपीज

रमजाम महिन्याच्या उपवासात खंड पाडायचा नसेल तर या रेसिपीज वन

Pooja Karande-Kadam

Ramadan Food : मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान सध्या सुरू आहे. या दिवसात सेहरी आणि इफ्तारीला खाऊन पाणी आणि अन्नाशिवाय लोक दिवसभर राहतात. रमजान ईद दिवशी चंद्र दिसतो आणि या महिन्याची सांगता होते.  रोजाची सुरुवात सकाळी सेहरीने होते आणि त्यानंतर संध्याकाळी इफ्तारने रोजा सोडला जातो.

या पवित्र महिन्याची सुरुवात चंद्राच्या दर्शनाने होते. रमजानचा महिना कधी 29 दिवसांचा असतो तर कधी 30 दिवसांचा असतो. रमजान सुरू होताच मुस्लिम लोकं रोजा सुरू करतात. अरबी शब्दकोशात उपवासाला सौम म्हणतात, म्हणून या महिन्याला अरबीमध्ये माह-ए-सियाम असेही म्हणतात.

महिनाभर सुरू असलेल्या या उपवासात काही खास रेसिपीज बनवल्या जातात. काही लोक केवळ फळ खाऊन दिवस काढतात तर काही जेवण करून. लहान मुलेही आवडीने हे उपवास करतात. पण, कडक उन्हाळ्यात स्वत:ला फ्रेश ठेवण्यासाठी काही पदार्थांचे सेवन सेहरीच्या वेळी करणे चांगले असते.

आज आपण असेच काही पदार्थ पाहुयात. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर उर्जा मिळेल. तुम्ही फ्रेश राहून नमाज पठण करू शकाल.

सेहरी म्हणजे नेमके काय?

सूर्योदयापूर्वी फजरच्या अजानने उपवास सुरू होतो. यावेळी सेहरी घेतली जाते. इस्लामिक मान्यतेनुसार, रमजान महिन्यात सूर्योदयापूर्वी अन्न ग्रहण केले जाते. याला सहारी असे म्हणतात. सेहरीची वेळ आधीच ठरलेली असते.

इफ्तार म्हणजे काय?

दिवसभर खाण्यापिण्याशिवाय उपवास केल्यानंतर संध्याकाळी नमाज अदा केल्यावर खजूर खावून रोजा सोडला जातो. संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होते आणि मगरिबची अजान झाल्यावर रोजा सोडला जातो. याला इफ्तार म्हणतात. यानंतर, एखादी व्यक्ती सकाळी सेहरीपूर्वी काहीही खाऊ शकते.

लहान मुलंही निरागसतेने रोजे ठेवतात

खजुराचा हलवा

रमजानच्या महिन्यात खजुराचे जास्त सेवन केले जाते. प्रोटीन्सने भरलेले खजूर तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवतात. त्यामुळेच खजुरापासून बनलेला एक पदार्थ आज आपण पाहुयात. तो म्हणजे खजुराचा हलवा.

हलवा जास्त कॅलरींनी भरलेली असतो. तसेच, ते खाल्ल्याने तुम्ही दीर्घकाळ उपाशी राहू शकता. खजुरची खास गोष्ट म्हणजे शरीराची ऊर्जा वाढवण्यासोबतच मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय, हे हार्मोनल आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जे उपवासात निरोगी राहण्यास मदत करू शकते.

केळी आणि ओट्स स्मूदी

केळी आणि ओट्स स्मूदी हे फायबर युक्त पेय आहे. जे तुम्हाला जास्त काळ उपाशी राहण्यास आणि तुमचा चयापचय दर वाढवण्यास मदत करते. ही स्मूदी प्यायल्याने तुमची पचनक्रिया वेगवान होते आणि उपवासाच्या वेळी बद्धकोष्ठतेची समस्या टाळता येते.

केळीची स्मुदी दिवसभर फ्रेश ठेवेल

अंडा पराठा

अंडा पराठा तुमच्यासाठी दिवसभराच्या उपवासाच्या आधी चविष्ट आणि उच्च प्रथिनयुक्त पदार्थ असू शकतो. हे खाल्ल्याने तुमच्या तोंडाची चव बदलू शकते. शरीरात ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे सेहरी दरम्यान अंडी भुर्जी आणि अंडा पराठा यांसारख्या उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करायला विसरू नका.

अंडा पराठा बनवूनही लगेच होतो, त्यामुळे वेळही वाचतो

सीख कबाब

सेहरीमध्ये समाविष्ट असलेले सीख कबाब हे संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा देणारे अन्न असू शकते. हे खाल्ल्याने तुमच्या शरीरात दिवसभर एनर्जी राहील आणि तुमच्या कामालाही फायदा होईल. तर, अशा प्रकारे रमझानमध्ये सेहरीमध्ये या पदार्थांचा समावेश करून तुम्ही संपूर्ण रमजानमध्ये स्वतःला निरोगी ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT