recipe how to make pudina raita masala  
फूड

Raita Masala Recipe: टिपिकल रायत्याला येईल नवी चव, पुदिन्याचा मसाला बनवा अन् स्टोअर करा

सकाळ डिजिटल टीम

जेवताना प्रत्येकाला तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवच असतं. ताटात तोंडी लावण्यासाठी बहुतांश गृहिणी लोणचं, कोशिंबिर, भजी, रायता अनेक विविध प्रकार करताना दिसतात. पण या सर्वांत रायता...अहाहा...रायता हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. प्रत्येकजण आपापल्या चवी नुसार रायता बनवत असतो. रायत्यामध्ये अनेक प्रकारही पाहायला मिळतात. बुंदी रायता, कांदा रायता, भाजी रायता असे अनेक प्रकार आहेत. पण रायत्याचा प्रकार कोणताही असो.

रायता सहसा फळे, भाज्या किंवा बुंदीमध्ये दही मिसळून बनवले जाते. ते अधिक चवदार बनवण्यासाठी त्यात चाट मसाला आणि जिरे टाकले जातात. पण आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत ज्यामुळं तुमच्या रायत्याची आणखी स्वादिष्ट होईल.(how to make pudina raita masala)

पुदिना मसाला चटणी, रायता, कोशिंबीर, चाट किंवा पेयांमध्ये वापरला जातो. हा पुदिना मसाला चवीसोबतच आरोग्यासाठीही खुप फायदेशीर आहे. हा मसाला घातल्याने पदार्थाला एक वेगळीच चव येते.

तर हा पुदीना मसाला कसा बनवायचा?

साहित्य

पुदिन्याची ताजी पाने - 2 चमचे

हिरवी धणे पाने - 2 चमचे

हिरवी मिरची - 3 पीसी

भाजलेले जिरे पावडर - 1 टीस्पून

काळे मीठ - चवीनुसार

काळी मिरी पावडर - 1 टीस्पून

चाट मसाला- 1 टीस्पून

आमचुर पावडर - 1 टीस्पून

लिंबाचा रस - 2 चमचे

कृती

पुदिन्याची ताजी पानं आणि हिरवी कोथिंबीर नीट धुवा. त्यातील पाणी नितळून घ्या. यानंतर पुदिना आणि हिरवी कोथिंबीर मिक्सर ग्राइंडरमध्ये टाका. आता हिरवी मिरची मिक्सरमध्ये टाकून पेस्ट बनवा. यामध्ये थोडं पाणी घालू शकता जेणेकरून ते सहज बारिक होईल. आता या पेस्टमध्ये भाजलेले जिरे पावडर, काळे मीठ, काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि आमचुर पावडर घाला. ते चांगले मिसळा. आवश्यक असल्यास, आपल्या चवीनुसार मसाले घाला. जर तुम्हाला ते थोडे अधिक आंबट करायचे असेल तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता.

हा मसाला स्टोअर करण्यासाठी हवाबंद झाकणाची बरणी निवडा. बरणीमध्ये मसाला भरल्यानंतर त्याचे झाकण चांगले बसवले पाहिजे. यामुळे त्याचा सुगंध बराच काळ टिकून राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT