tamarind Esakal
फूड

Recipe: गाभोळ्या चिंचेचा ठेचा कसा तयार करायचा?

सकाळ डिजिटल टीम

नोव्हेंबर महिण्यांमध्ये जशी जशी थंडी पडू लागते तशी तशी मग रानमेव्याची रेलचेल सुरू होते. पेरू,बोरं, हिरवी चिंच,आवळे, ऊसानी शेतशिवार फुलून येते. हा रानमेवा जसाजसा बहरू लागतो मग तसेतसे त्यापासून वेगवेगळे खाद्यपदार्थही घराघरात बनवले जाऊ लागतात.

या सगळ्यात रानमेव्यात महिलांचा आवडता घटक आहे चिंच...

चिंच खाणे हे आपल्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चिंच केवळ चवच वाढत नाही तर आरोग्य सुधारण्यातही ती विशेष भूमिका बजावते. चिंचेमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि फायबर हे पौष्टिक घटक असतात जे आरोग्यास अनेक मार्गांनी मदत करतात. चिंचेमध्ये अनेक पौष्टिक पदार्थ आहेत ते आरोग्याच्या अनेक समस्यांपासून संरक्षण करण्यात मदत करतात.

चिचेंला बहर लागला की आजही ग्रामीण भागात हिरव्या म्हणजे गाभोळ्या चिंचेचे वेगवेगळे पारंपारिक पदार्थ बनवून खाल्ले जातात.त्यात नुसती मिठ लाऊन चिंच खाण्यापासून ते कढी, वरण, ठेचा असे चिंचेचे अनेक प्रकार केले जातात.

हिरव्या चिंचेचा ठेचा करण्यासाठी लागणारे साहित्य:

1) चार बोटूक हिरवी चिंच

2) चार ते पाच हिरवी मिरची

3) चवीनूसार मीठ

4) जिरं-मोहरी फोडणीसाठी

5) हिंग

6) तेल

कृती:

सर्वप्रथम चिंच हिरवी मिरची स्वच्छ धूवून कोरडी करून घ्यावी. चिंच निब्ब कडक असेल तर चिंचेची साल काढून आतल्या पांढरट बिया काढून टाकाव्या. नंतर मग चिंचेचे आणि मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून घ्यावे. पुढे मग हे चिंचेचे आणि मिरचीचे तुकडे त्यात थोडसं मिठ घालुन मिक्सरवर थोडं जाडसर फिरवून घ्यावे.नंतर मग लोखंडी कढईत तेल गरम करून जिरं मोहरी हिंगाची फोडणी देऊन घ्यावी, फोडणी थंड झाली कीमिश्रणावर टाकून मिश्रण कालवून काचेच्या बाटलीत तो ठेचा भरून ठेवावा.

● चिंचेचा ठेचा हा पदार्थ गावाकडे तिखट भाजी सोबत तोंडी लावायला खास करून खाल्ला जातो.

● हा ठेचा तुम्ही चार सहा महिने टिकवायचा असेल तर हवाबंद काचेच्या भरणीत तो ठेवावा मग तो खराब होत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: बंदी असूनही जड वाहने रस्त्यावर, वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण

28 Four, 18 Sixes! झिम्बाब्वेने T20 मध्ये ठोकल्या तब्बल २८६ धावा! भारताचा विक्रम थोडक्यात वाचला

Akhilesh Yadav : भाजपकडून माणसे तोडण्याचे काम : खासदार अखिलेश यादव

Winter Health Care: हिवाळ्यात दिवसभर उत्साही अन् हायड्रेट राहायचंय? मग स्वत:ची 'अशी' घ्या काळजी

Latest Maharashtra News Updates LIVE : निलेश राणे वर्षा बंगल्यावर दाखल

SCROLL FOR NEXT