Sohan Halwa Recipe esakal
फूड

Sohan Halwa Recipe : ही टेस्टी डिश खाऊन विसरून जाल इतर मिठाईंची चव, लगेच नोट करा रेसिपी

साक्षी राऊत

Sohan Halwa Recipe : लवकरच सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत. या काळात मार्केटमध्ये मिठाईंच्या खरेदीसाठी लोकांची प्रचंड गर्दी असते. वेगवेगळ्या चवींच्या मिठाई घरात आणून सण साजरे करणे हा भारतीय परंपरेचाच एक भाग आहे. भारतीय मिठाईचे प्रकार विचारात घेतले तर मार्केटमध्ये अनेक मिठाई उपलब्ध असतात, लोकांनाही त्या प्रचंड आवडतात. मात्र आज आपण अशा एका स्वीट डिशची रेसिपी जाणून घेणार आहोत जी एकदा खाल्ल्यावर तुम्हाला ती परत परत खायची इच्छा होईल.

या डिशचं नाव आहे सोहन हलवा. मैदा, दूध आणि सुका मेवा एकत्र करून ही डिश तयार केली जाते. ही डिश बनवायला थोडा जास्त वेळ लागत असला तरी ती खायला खूप चविष्ट आहे. सोहन हलवा खाल्ल्यानंतर तुम्ही इतर सर्व मिठाईची चव विसराल. चला जाणून घेऊया सोहन हलवा बनवण्याची पद्धत.

सोहन हलव्यासाठी लागणारे साहित्य

सोहन हलवा बनवण्यासाठी तुम्हाला

मैदा - 1/2 किलो साखर

1/2 किलो

बदाम - 1/4 किलो

तूप - 1/2 किलो

दूध - 1 कप

पिस्ता - 100 ग्रॅम

बेदाणे - 5-6

काजू - 5-7

हिरवी वेलची - 5-7 (Food)

सोहन हलवा बनवण्याची पद्धत

1. सोहन हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात एक लिटर पाणी गरम करा. आता त्यात साखर घाला.

2. नंतर त्यात एक कप दूध घाला. ५ मिनिटे शिजू द्या.

3. आता गरम झालेले द्रव कपड्याने गाळून घ्या. नंतर उरलेले पाणी आणि साखरेचा पाक मिक्स करा. (Recipe)

४. यानंतर मैदा घ्या आणि पाण्यात घोळून त्याला मंद आचेवर शिजवा. आता पीठ घट्ट होऊ लागले की त्यात एक मोठा चमचा तूप घाला. सतत ढवळत राहा म्हणजे ते चिकटणार नाही.

5. काही वेळाने हे तुपाचे मिश्रण वेगळे दिसू लागेल. यावरून समजून घ्या हे मिश्रण शिजून रेडी झाले आहे.

6. आता त्यात ड्राय फ्रुट्स म्हणजे बदाम, पिस्ता आणि हिरवी वेलची घाला. आता तूप लावल्यानंतर हे मिश्रण ट्रे किंवा प्लेटमध्ये काढून पुडिंगसारखे पसरवा.

7. बदाम, पिस्ता, काजूने सजवा. नंतर थंड झाल्यावर त्याचे तुकडे करा. आता ते सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. तुमची स्वीट डिश तुम्ही कधीही खाऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

IND vs NZ 1st Test : आता आमची सटकली...! Virat Kohli - सर्फराज खान यांची तुफान फटकेबाजी; भारताचा न्यूझीलंडवर पलटवार

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील धार्मिक संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपने रणनीति आखली

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT