Satara Special Shengdana Mahadya : महाराष्ट्र हा आपल्या आगळ्यावेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. त्यात खाद्य संस्कृती महत्त्वाची भूमिका बजावते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात खाद्यसंस्कृतीमध्ये विभिन्नता दिसून येते आणि हिच खाद्यसंस्कृती त्या भागाची ओळख बनते.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शेंगदाण्याचा म्हाद्या विशेष प्रसिद्ध आहे. इतर भागातील लोक याला शेंगदाण्याची आमटीही संबोधतात. आज आपण या सातारा स्पेशल शेंगदाण्याचा म्हाद्या या खास रेसिपीविषयी जाणून घेणार आहोत. (satara special shengdana mahadya recipe maharashtra din )
सातारा हा त्याच्या झणझणीत स्वभावासाठी ओळखला जातो. तशीच सातारी झणझणीत सातारी शेंगदाण्याचा म्हाद्या रेसिपी करण्यासाठी खालीलप्रमाणे साहित्य असावे -
साहित्य -
तेल
शेंगदाणे
कांदा
जीरे मोहरी
कांदा
लसूण मसाला
तिखट
हळद
हिंग
कोथिंबीर
पाणी
लसूण पाकळ्या
कडीपत्ता पाने
हिरवी मिरची
कृती
सुरवातीला शेंगदाणे भाजून घ्या
भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करा.
त्यानंतर कांदा चिरुन घ्या
लसूण आणि मिरची बारीक वाटून घ्या.
त्यानंतर कढईत तेल तापवा.
त्यात जिरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग, बारीक वाटलेली लसूण आणि मिरची टाका त्यानंतर कांदा परतून घ्या.
त्यानंतर त्यात तिखट,कांदा लसूण मसाला आणि तिखट परतून घ्या.
त्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घाला आणि वरुन मिक्सरमधून बारीक केलेली शेंगदाण्याची भरड मिक्स करा आणि चांगलं परतून घ्या.
त्यात पाणी घाला आणि मिक्स करा. सात आठ मिनिटे शिजवू द्या
त्यानंतर वरुन कोथिंबिर घाला.
असा तुमचा शेंगदाण्याचा म्हाद्या तयार होणार. तुम्ही शेंगदाण्याचा म्हाद्या भाकरीसोबत खाऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.