Shardiya Navratri 2024: Sakal
फूड

Navratri Recipe: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बनवा कुरकुरीत उपवासाचे रोल, नोट करा रेसिपी

पुजा बोनकिले

साप्ताहिक सकाळ: प्रणिता सचिन कुलकर्णी

Shardiya Navratri 2024: हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खुप महत्व आहे. यंदा शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट आणि समस्या दूर होतात. तसेच माता दुर्गेची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहते. या दिवसांमध्ये अनेक लोक उपवास करतात. तुम्हाला साबुदाणा किंवा भगर खायची नसेल तर उपवासाचे रोल बनवू शकता. हे रोल बनवणे खुप सोपे असून चवदार देखील आहे. तसेच तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही. चला तर मग जाणून घेऊया उपवासाचे रोल बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे.

उपवासाचे नगेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

नगेट बनवण्यासाठी

एक वाटी साबुदाणा पीठ

१ वाटी भगरीचे पीठ

२ उकडलेले बटाटे

२ चमचे तिखट

१ चमचा जिरे

१ चमचा आल्याची पेस्ट

तेल

चवीनुसार मीठ

चटणीसाठी लागणारे साहित्य

एक वाटी शेंगदाण्याचा कूट

पाव वाटी मलाई

१ चमचा तिखट

पाव चमचा जिरे

चवीनुसार मीठ

उपवासाचे नगेट बनवण्याची कृती

उपवासाचे नगेट बनवण्यासाठी सर्वात आधी उकडलेले बटाटे मॅश करून त्यात साबुदाण्याचे पीठ, भगरीचे पीठ, आल्याची पेस्ट, तिखट, मीठ, जिरे सगळे साहित्य घालून मिक्स करून घ्यावे.

त्याला नगेटचे आकार द्यावा.

नंतर कढईमध्ये तेल तापवून मंद विस्तवावर सगळे नगेट तळावेत.

चटणी तयार करण्यासाठी शेंगदाण्याचा कूट, तिखट, मीठ, जिरे, मलई सगळे साहित्य मिक्स करावे.

नंतर त्यात थोडे पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे.

एका डिशमध्ये नगेट घेऊन चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या कॅप्टन, तर 150 kmph वेगात बॉलिंग करणाऱ्या मयंक यादवलाही संधी

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार'' राज ठाकरेंनी मांडलं गणित

Solapur News: ''भीमा" करणार पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप, खासदार धनंजय महाडिक यांचे वक्तव्य

MMRDA कडून 'या' परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला मंजूरी, 8,498 कोटी रुपयांची तरतूद

IPL Retention: ५ खेळाडू कायम राखण्याची फ्रँचायझीला मोजावी लागेल भारी रक्कम; थेट पॉकेटमधून ७५ कोटी कापणार

SCROLL FOR NEXT