Shegaon Kachori  sakal
फूड

Maharashtra Din : पाकिस्तानात जन्मलेल्या व्यक्तीने आणली होती शेगावात कचोरी; वाचा प्रसिध्द 'शेगाव कचोरी'चा इतिहास

तुम्हाला माहिती आहे का शेगावमध्ये ही कचोरी आली कशी?

निकिता जंगले

Maharashtra Din : महाराष्ट्रात वेगवेगळी खाद्यसंस्कृती फेमस आहे. प्रत्येक शहर जिल्हा एका विशिष्ट खाद्य संस्कृतीमुळे प्रसिद्ध आहे. तसंच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जसं संत गजानन महाराजांसाठी फेमस आहे तसंच तेथील कचोरीसुद्धा जगप्रसिद्ध आहे.

शेगावच्या प्रसिद्ध कचोरीची चर्चा देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का शेगावमध्ये ही कचोरी आली कशी? आज आपण या कचोरीचा अनोखा इतिहास जाणून घेणार आहोत. (Shegaon Kachori brought by a man born in pakistan read history of famous Shegaon Kachori Maharashtra Din special)

तिरथराम शर्मा नावाचे गृहस्थ हे मुळचे पाकिस्तानातील लाहोर येथील. देशाच्या फाळणीपूर्वीच त्यांनी लाहोर सोडून अमृतसर गाठले. पोटापाण्यासाठी त्यांनी अमृतसरमध्ये कचोरीचा व्यवसाय सुरू केला. पुढे अमृतसरमध्ये त्यांची कचोरी फेमस झाली पण त्यांना काही कारणास्तव अमृतसर सोडावे लागले आणि व्यवसायच्या दृष्टीने त्यांनी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला.

१९४८-४९ चा तो काळ होता. कुटूंबाच्या पोटापाण्यासाठी त्यांनी वर्षभर होजियरी वस्तू विकल्या. पुढे अनेक शहराच्या रेल्वेस्टेशनवर कँटीन चालवण्यासाठी टेंडर निघाले होते. यादरम्यान त्यांनी शेगावसाठी टेंडर भरले आणि त्यांना मिळाले आणि येथूनचा त्यांचा शेगाव नवा प्रवास सुरू झाला.

शेगावला आल्यानंतर त्यांनी त्यांच्या कँटीनमध्ये कचोरीसुद्धा ठेवली होती. ही कचोरी लोकांच्या पसंतीस उतरली आणि कालांतराने ही कचोरी प्रसिद्ध झाली. 'शेगावची कचोरी' म्हटलं की कोणीही तिरथराम शर्मा यांचे नाव घ्यायचे. विशेष म्हणजे याचा मसाला ते स्वत: घरी बनवायचे.

शर्मा यांना पाच मुले आणि तीन मुली होत्या. पुढे त्यांची पिढी याच व्यवसायत उतरली त्यांनी कचोरीचा व्यवसाय आणखी मोठा केला. शेगावसह इतर शहरांमध्येही शेगावच्या कचोरीची सेंटर्स आहेत.

Shegaon Kachori

तिरथरामजी शर्मा यांच्या पाच मुलांकडून १६ नातवंडांना मसाल्याचा फार्म्युला माहिती आहे. विशेष म्हणजे शर्मा भावंडं या रेसिपीविषयी कुणालाही सांगत नाही कारण यातच त्यांचा व्यवसायाचं रहस्य टिकलं आहे.

अनेकजण शेगावच्या कचोरीचं नाव वापरुन मार्केटमध्ये येण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे शर्मा कुटूंबांनी ब्रॅंडचे नाव जपण्यासाठी ट्रेड मार्क नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आणि 'तिरथराम करमचंद शर्मा शेगाव कचोरी सेंटर' असे नाव २००९ मध्ये नोंदवले. गुणवत्ता, सेवा, स्वच्छता इत्यादी बाबी तपासल्यानंतर मानांकन देणाऱ्या संस्थेने शेगाव कचोरीला 'आयएसओ मानांकन' दिले आहे.

Shegaon Kachori

शेगावची कचोरी आज देशातच नाही तर परदेशातही तितकीच फेमस आहे. शेगावला येणारा प्रत्येक व्यक्ती शेगावची कचोरी ही चाखतोच. शेगावच्या कचोरीने शेगावला एक आगळी वेगळी ओळख दिली आहे.

पुर्वी रेल्वेत ही कचोरी मिळायची पण कालांतराने ती बंद करण्यात आली होती मात्र आता दहा बारा वर्षानंतर एक मे पासून ही कचोरी पुन्हा एकदा रेल्वेतही मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT