Shravan Somavar Recipe Sakal
फूड

Shravan Recipe: श्रावणी सोमवारी उपवासाला बनवा कच्च्या केळीची कचोरी, दिवसभर राहाल उत्साही

Shravan Somavar Recipe: श्रावणी सोमवारी उपवास करायचा आणि दिवसभर उत्साही राहायचे असेल तर कच्च्या केळीची कचोरी बनवू शकता.

पुजा बोनकिले

Raw Banana Kachori Recipe: यंदा श्रावण महिना 5 ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि विशेष म्हणजे यावेळी पहिला सोमवारसुद्धा 5 ऑगस्टलाच आहे. या दिवशी शिवभक्त मनोभावे महादेवाची पूजा करतात आणि उपवास करतात. पण तुम्हाला दिवसभर उत्साही राहायचे असेल तर कच्च्या केळीपासून कचोरी बनवू शकता. कच्च्या केळीपासून बनवलेली कचोरी चवीला स्वादिष्ट असून बनवायला सोपी आहे. ही कचोरी खाल्यावर दिवसभर थकवा जाणवणार नाही. कच्च्या केळीमध्ये फायबर, पोटॅशिअम यासारखे पोषक घटक असतात. यामुळे उपवासा दरम्यान शरीराला पोषक घटकांची कमतरता जाणवत नाही. कच्च्या केळीपासून कचोरी कशी बनवायची जाणून घेऊया.

कचोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

राजगिऱ्याचे पीठ- १ कप

कच्ची केळी- ४-५

हिरवी मिरची -३-४

काळे मिरे पावडर- १ चमचा

आल- एक तुकडा

तेल- गरजेनुसार

सेंधव मीठ - चवीनुसार

कचोरी बनवण्याची कृती

कच्च्या केळीची कचोरी बनवण्यासाठी सर्वात आधी कच्ची केळी स्वच्छ पाण्याने धुवावी आणि त्याची साल काढून गरम पाण्यात उकळावे.

उकळल्यानंतर केळी थंड होऊ द्या. नंतर बारिक करून घ्यावे.

बारिक केलेल्या केळ्यांमध्ये बारिक चिरलेली हिरवी मिरची, आलं, काळी मिरी, सेंधव मीठ, राजगिरा पीठ, पाणी मिक्स करून घ्यावे.

नंतर या मिश्रणाचे छोटे गोळे बनवावे आणि हलक्या हाताने सपाट करून लाटून घ्यावे.

एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात कचोऱ्या तळून घ्यावे. कचोरी तळतांना मध्यम आचेवर तळळ्यास आतून कच्ची राहत नाही. गरम कचोरीचा दह्यासोबत आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT