Shravan Special Recipe: श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यात महादेवाची मनोभावे पुजा केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात. अनेक शिवभक्त या दिवसांमध्ये उपवास करतात आणि मनोभावे पुजा करतात. यंदा ५ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू झाला असून आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे. श्रावण महिन्यात महादेवाला पांढरे फुल आणि बेलाचे पान अर्पण करणे शुभ मानले जाते.
तुम्हाला उपवासाला काही खास पदार्थ बनवायचे असेल तर फराली कटलेट बनवू शकता. हे कटलेट बनवणे खुप सोपे असून चवदार आहे. फराळी कटलेट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत कोणती हे जाणून घेऊया.
उकडलेले बटाटे - 1 कप
काळी मिरी पावडर - 1 टीस्पून
भाजलेले जिरं पावडर - 1 टीस्पून
मीठ - चिमूटभर
हिरव्या मिरचीची पेस्ट - 1 टीस्पून
भाजलेले शेंगदाणे पावडर - 1/2 कप
शिंगाडा पावडर - 1/3 कप
लिंबू ज्यूस - 1 टेस्पून
फराळी कटलेट बनवण्यासाची सर्वात आधी एका भांड्यात उकडलेला बटाटा,काळे मिरं पावडर, मीठ,जिरं पावडर, हिरवी मिरची पेस्ट, शेंगदाण्याची पावडर, शिंगाडा पीठ, लिंबाचा रस टाकून चांगले मिक्स करावे.
नंतर हाताला तेल लावून कटलेट तयार करावे.
नंतर एका कढईत तेल गरम करावे आणि त्यात तपकिर होईपर्यंत तळून घ्यावे.
दह्यासोूक फराळी कटलेटचा आस्वाद घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.