spicy dishes without oil for monsoon  
फूड

Monsoon: पावसाळ्यात ट्राय करा 'हे' ऑईल फ्री स्नॅक्स

अनेकदा संध्याकाळी हलकी हलकी भूक लागत असते अशावेळी काय खावे असा प्रश्न पडतो. मग अनेक तळलेलं पदार्थ समोर येत असतात.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळयाच्या दिवसांत थंड वातावरणात नेहमीच प्रत्येकाला काही तरी चटपटीत खावेसे वाटत असते. अनेकदा संध्याकाळी हलकी हलकी भूक लागत असते अशावेळी काय खावे असा प्रश्न पडतो. मग अनेक तळलेलं पदार्थ समोर येत असतात. कांदा भजी, भजी अनेक प्रकार, समोसे, फ्रेंच फ्राईज. पण सुरु असलेलं डाएट आणि वाढते वजन पाहात मनात इच्छा असूनदेखील आपण हे असे तळलेलं पदार्थ खाण्यास टाळतो. (spicy dishes without oil for monsoon )

पण टेन्शन घेऊ नका. भारतीय खाद्यसंस्कृतीत असे अनेक पदार्थ जे तुम्ही बिनधास्त खाऊ शकता. आणि आज आम्ही त्याच पदार्थांची यादी देणार आहोत जे तेलविरहित आणि स्वादिष्टदेखील आहेत.

खांडवी (सुरळीची वडी)

बेसन आणि दही किंवा ताकापासून बनवलेला हा गुजराती पदार्थ तुम्ही पावसाळ्यात ट्राय करु शकता. याला तेलाची अधिक आवश्यकता नसते. केवळ ग्रीसिंगसाठी आणि फोडणीसाठी तेल वापरावे लागते.

ढोकळा

रवा, बेसन, दही हिरव्या मिरचीची पेस्ट आणि पाणी एकत्र करुन पीठ तयार करा. त्यानंतर हे बॅटर तुम्ही कुकरमध्ये वाफवून घ्या. तुमचा ढोकळा तयार.

पापड चाट

पापड चाट बनवणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला दोन पापड घेऊन दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे लागतील. आता त्यात टोमॅटो, कांदा, काकडी, लिंबाचा रस, चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि टोमॅटो सॉस घाला. एकतर हे सर्व बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या, मिक्स करा आणि पापडांवर घाला आणि शेवटी टोमॅटो सॉस घाला आणि सर्व्ह करा.f

स्टीम मोमोज

स्टीम मोमोजमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. जसे कोबी, गाजर, लसूण, कांदा, हवे असल्यास त्यात चीजही घालू शकता. पीठ मळताना त्यात थोडे मीठ टाका, चव वाढेल. आता तुम्ही मेयोनेझ आणि रेड चिली सॉस बरोबर सर्व्ह करू शकता.

पोहे

ऑईल फ्री पोहे बनवण्यासाठी प्रथम पोहे भिजवून चांगले धुवावेत. आता त्यात हळद, मीठ, थोडी साखर, लिंबाचा रस आणि तिखट घालून मिक्स करा. आता स्टीमरमध्ये ५ मिनिटे गरम करा. स्टीमर प्रीहिटेड असल्याची खात्री करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT