Cucumber Raita Recipe health Benefits Esakal
फूड

Cucumber Raita Recipe: उन्हाळ्यात पचनक्रियेसाठी काकडीची कोशिंबीर ठरेल फायदेशीर, वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पापड, लोणचं किंवा चटण्या खाल्ल्याने कदाचित पोटात जळजळ होवू शकते. तसचं अपचणाचा त्रासही होवू शकतो. अशा वेळी काकडीची कोशिंबीर हा पर्याय उत्तम ठरू शकतो

Kirti Wadkar

Cucumber Raita Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी अत्यंत उपयुक्त ठरते. काकडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

काकडीमध्ये ९५ टक्के पाण्याचं प्रमाण असचं त्यामुळे शरीरातील पाण्याची Water पातळी नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. काकडीसोबत काकडीची कोशिंबीरही शरीरासाठी फायदेशीर ठरते. summer healthy recipe how to make cucumber raita indian style

काकडीच्या कोशिंबीरमुळे Cucumber Raita वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसचं अपचनाचा Indigestion त्रास दूर होतो. काकडीच्या कोशिंबीरीमुळे तुमचं वाढलेलं ब्लड प्रेशर Blood Pressure नियंत्रणात येऊ शकतं. तसचं पोटासंबधी अनेक समस्या यामुळे दूर होतात

जेवताना ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी काही असेल तर जेवणाची मजा अजूनच वाढते. अशात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पापड, लोणचं किंवा चटण्या खाल्ल्याने कदाचित पोटात जळजळ होवू शकते.

तसचं अपचणाचा त्रासही होवू शकतो. अशा वेळी काकडीची कोशिंबीर हा पर्याय उत्तम ठरू शकतो. यामुळे पोटात जळजळ किंवा अपचनाचा त्रास होणार नाही शिवाय पोटाला गार वाटेल. Cucumber raita benefits 

उन्हाळ्यात अपचनाचा त्रास कमी व्हावा यासाठी कशा प्रकारे काकडीची कोशिंबीर तुम्ही बनवू शकता याची रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. . Cucumber raita recipe 

हे देखिल वाचा-

काकडीच्या कोशिंबीरीसाठी साहित्य- एक मोठी काकडी, दही १ कप, लाल मिरची पावडर पाव चमचा, जीरंपूड १ छोटा चमचा, कोथिंबीर, पुदीना, काळं मीठ/ मीठ, चाट मसाला

कृती- 

-काकडीची कोशिंबीर तयार करण्यासाठी स्वच्छ धुतलेली काकडी किसून घ्यावी. 

- एका बाऊलमध्ये किसलेली काकडी टाकावी. त्यात दही आणि पाव कप पाणी टाकावं.

- त्यानंतर यात लाल मिरची पावडर, जीरंपूड, चाट मसाला आणि मीठ टाकावं आणि सर्व साहित्य एकजीव करून घ्यावं. 

-त्यानंतर यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदीन्याची पानं टाकावी. 

- १५ मिनिटांसाठी तुम्ही कोशिंबीर फ्रिजमध्ये ठेवू शकता.

अशा प्रकारे थंडगार कोशिंबीर तुम्ही जेवताना तोंडी लावायला घेऊ शकता. 

फोडणीची कोशिंबीर

या कोशिंबीरीची चव वाढवण्यासाठी तुम्ही यात तडका देखील देऊ शकता. यासाठी एका छोट्या कढईत एक चमचा तेल गरम करावं.

या तेलात अर्धा चमचा मोहरी, कडीपत्त्याची ५-६ पानं आणि हिंग टाकावं ही फोडणी कोशिंबीरमध्ये वरून टाकावी. त्यानंतर अलगद ती कोशिंबीरमध्ये मिसळावी. यामुळे कोशिंबीर अधिक खमंग लागेल. 

काकडीच्या कोशिंबीरचे फायदे

१.शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत- उन्हाळ्यात अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. काकडीमध्ये जवळपास ९५ टक्के पाणी असतं.

म्हणूनच काकडीची कोशिंबीर खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या निर्माण होत नाही. तसचं शरीरातील टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते. Cucumber benefits 

२. पचनासाठी उपयुक्त- कोशिंबीरमुळे पचनस्स्थेचं कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेलं फायबर पचन सुधारण्यास मदत करतात.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात नियमितपणे काकडीची कोशिंबीर खाल्ल्यास पोटात गॅस होणं, बद्धकोष्ठता आणि अपचनासारख्या पोटाच्या समस्या कमी होतात. 

हे देखिल वाचा-

३. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं- उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी काकडीची कोशिंबीर फायदेशीर ठरू शकते. यात मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं यामुळे रक्त दाब कमी होण्यास मदत होते. Cucumber for high blood pressure 

४. वजन कमी करण्यासाठी- काकडीच्या रायता किंवा कोशिंबीरमुळे वजन कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. याच फायबरच प्रमाण भरपूर असल्याने जास्त काळासाठी पोट भरलेलं राहतं. त्यामुळे सारखी भूक लागत नाही. तसचं यात कॅलरीचं प्रमाणही कमी असत. 

अशा प्रकारे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही काकडीच्या कोशिंबीरीचा जेवणात समावेश करून पोटाच्या आणि पचनाच्या समस्या दूर करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT