उन्हाळा सुरू होताच घराघरांत थंड पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. उन्हाळ्यात लोक शरीराला थंड ठेवण्यासाठी अनेक उपाय करतात. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश केला जातो.
पण यंदा उन्हाळ्यात चवदार लस्सीचा आस्वाद घेऊ शकता. लस्सी देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यत सर्वांनाच लस्सी आवडते. जर तुम्हालाही या उन्हाळ्यात लस्सीचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही ती अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकता.
लस्सी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
दही - 1/2 किलो
साखर - 1/2 कप
दूध - 1 कप
काजू - बारिक तुकडे
बदाम - बारिक तुकडे
तुटी फ्रूटी - 1 टीस्पून
क्रीम - 2 टीस्पून
बर्फाचे तुकडे
लस्सी बनवण्याची कृती
लस्सी बनवण्यासाठी सर्वात पहिले दही एका भांड्यात काढून घ्या. जर तुम्हाला थंड दही लस्सी प्यायची असेल तर सर्वात पहिले दही काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. नंतर रवीचा वापर करून दही चांगले घुसळून घ्या. यानंतर त्यात साखर टाका आणि चांगले मिक्स करा. त्यात घातलेली साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत दही मिक्स करत राहावे.
या मिश्रणात थंड दूध टाका आणि पुन्हा एकदा दही आणि दूध नीट मिक्स करावे. दही पूर्णपणे गुळगुळीत होईपर्यंत ही प्रक्रिया करावी. यानंतर एका ग्लासमध्ये लस्सी काढा आणि त्यात बर्फाचे तुकडे टाका. यानंतर लस्सीमध्ये फ्रेश क्रीम घाला आणि सजावटीसाठी बारिक चिरलेले काजू आणि बदामचे तुकडे घालावे. त्यावर टुटी फ्रुटी टाका आणि सर्व्ह करा. घरातील प्रत्येक सदस्याला लस्सीची चव आवडेल.
टिप: लस्सीची चव वाढवण्यासाठी त्यात ड्रायफ्रुट्सही वापरू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.