Chicken Kebab Esakal
फूड

Sunday Special: घरच्या घरी चिकन कबाब कसे तयार करायचे?

स्नॅक प्लेटवर कबाब नेहमीच हिट राहिले आहेत आणि असतील.

सकाळ डिजिटल टीम

Chicken Kebab: स्नॅक प्लेटवर कबाब नेहमीच हिट राहिले आहेत आणि असतील. जर चिकन आणि मटण कबाब मांसप्रेमींना आकर्षित करतात . हेच  चिकन कबाब घरच्या घरी कसे तयार करायचे याची सविस्तर रेसिपी आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

साहित्य:

अर्धा किलो बोनलेस चिकन

दोन उकडलेले बटाटे

एक कांदा

एक गाजर

अर्धा कप चिरलेली कोबी

एक भोपळी मिरची

एक चमचा आले लसूण वाटण

हिरव्या मिरच्या

दीड कप चिरलेली कोथिंबीर

दोन चमचे मैदा

अर्धा कप प्रोसेस्ड चीझ

अर्धा कप मोझेरेला चीझ

दोन कप कच्ची शेव

दोन अंडी

मिरपूड

मीठ

तेल

कृती:

चिकन नीट धुऊन त्याला मीठ, आले-लसूण, हिरवी मिरची लावून थोडय़ाशा पाण्यात ते शिजवून घ्यावे. नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करावे. उकडलेले बटाटे किसून घ्यावे. गाजरही किसून घ्यावे. कांदा, बटाटा, भोपळी मिरची बारीक चिरून घ्यावे.

आता बटाटे, गाजर, चिकन, कांदा, भोपळी मिरची, कोबी, कोथिंबीर, मिरपूड, चीझ, मीठ घालून चांगले मळून घ्यावे. या मिश्रणाचे लांबट गोळे करून त्याचे कबाब बनवावे.

अंडी फोटून फेटून घ्यावी. या फेटलेल्या अंडय़ात हे कबाब बुडवून त्यानंतर कच्च्या शेवेमध्ये घोळवून गरम तेलात गुलाबी रंग येईपर्यंत तळावे. गरम गरम सॉस आणि मेयोनिझबरोबर हे कबाब खायला घ्यावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : शिंदे, वायकर, सामंत बंधू ते पाटील,जाधव; शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर, वाचा यादी एका क्लिकवर!

Ahmedabad News : गुजरातेत बनावट न्यायालयाचा पर्दाफाश; न्यायालयापासून न्यायाधीशापर्यंत सर्व काही बनावट

झेडपी शाळांमध्ये आता अंशकालीन निदेशक! आचारसंहितेनंतर मिळणार नियुक्त्या; शाळा व्यवस्थापन समितीला निवडीचा अधिकार; 45 दिवसांत अर्ज करण्याची मुदत

Gold : भाव वाढूनही सोन्याला ‘अच्छे दिन’; दोन वर्षांत २८ हजारांची भर

Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमधील जागावाटपावरून ‘इंडिया’ आघाडीत वाद; काँग्रेसकडून २१ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT