सकाळ साप्ताहिक- रेखा नाबर
Corn Soup Recipe: सध्या परतीचा पाऊस सर्वत्र पडत आहे. यामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. आज सुट्टी असल्याने कुटूंबातील सर्व सदस्य घरी असतात. तुम्ही सर्वांसाठी सकाळी नाश्त्यात मकई टॉप सुप तयार करू शकता. हा सुप चवदार असून आरोग्यदायी देखील आहे. घरातील सर्व सदस्य आवडीने आस्वाद घेतील. चला तर मग जाणून घेऊया मकई टॉप सुप बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची कृती काय आहे.
एक गाजर
५ फरसबीच्या शेंगा
१ भोपळी मिरची
अर्धी वाटी मक्याच्या कणसाचे दाणे वाफवून
तूप
१ जिरे चमचा
हिंग
मीरपूड
सैंधव
मकई टॉप सूप बनवण्यासाठी सर्वात आधी मक्याचे दाणे वाफवून बाजूला ठेवावे.
नंतर भाज्या वाफवून मिक्सर मधून वाटून घ्याव्या.
तुपावर जिरे हिंगाची फोडणी करून त्यात भाज्यांचे मिश्रण ओतावे.
त्यात मीरपूड व सैंधव घालावे.
सूप बाऊलमध्ये घालून वर कणसाचे दाणे पेरून खायला द्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.